मुंबई, 25 नोव्हेंबर : बहुचर्चित सिनेमा 'ब्रह्मास्त्र' पुढच्या वर्षी रिलीज होतोय. सिनेमाचं शूटिंग जोरात सुरू आहे. रणबीर आणि आलिया यात कमालीचे बिझी आहेत.
आलिया आणि रणबीर सध्या मुंबईत शूट करतायत. त्यांच्या शूटिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात दोघं चक्क छतावर पळतायत.म्हणजे व्हिडिओत गच्चीचा कठडा दिसतोय. त्यावर ते धावतायत. आलियानं स्कर्ट घातलाय, तर रणबीरनं कॅज्युअल्स घातलेत.
काही दिवसांपूर्वी आलिया भटच्या पायाला लागलेलं. त्यासाठी ती डाॅक्टरकडेही गेलेली. हातात काठी घेऊन चालत असलेला तिचा फोटो व्हायरल झाला होता.
काही दिवसांपूर्वी सिनेमाचं शूटिंग बल्गेरियात झालं. तेव्हा अमिताभ बच्चनही तिथे होते. तिथे असलेल्या धुंद वातावरणात सेटवरील कुणीतरी इथं मस्त गरमागरम समोसे आणि वडापाव खायला मिळाला तर काय मज्जा येईल अशी इच्छा व्यक्त केली. बिग बींनी लगोलग ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी कूकला सांगून संपूर्ण क्रूसाठी गरमा गरम वडापाव आणि सामोसे बनवायला सांगितले. त्यानंतर स्वतः सोशल मीडियाद्वारे ही बातमी आपल्या फॅन्सनाही सांगितली. सेटवर सगळ्यांनी त्याच्यावर मस्त ताव मारला.
ब्रह्मास्त्र सिनेमा एक रोमँटिक कथा आहे आणि त्याला सुपरनॅचरल शक्तीची जोड आहे. रणबीर आणि आलिया यांचा रोमान्स सिनेमात पहायला मिळणार आहेच. पण त्याशिवाय अमिताभ बच्चन यांची हटके भूमिका या सिनेमात असेल.