मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलिया-रणबीर कपूरला महाकालच्या दर्शनासाठी विरोध, हिंदू संघटनांच्या आंदोलनामुळे वाद

आलिया-रणबीर कपूरला महाकालच्या दर्शनासाठी विरोध, हिंदू संघटनांच्या आंदोलनामुळे वाद

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना महाकाल मंदिर दर्शन मिळालं नाही. दर्शनासाठी आलेल्या दोघांनाही आल्या पावली परत जाण्याची वेळ आली.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना महाकाल मंदिर दर्शन मिळालं नाही. दर्शनासाठी आलेल्या दोघांनाही आल्या पावली परत जाण्याची वेळ आली.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना महाकाल मंदिर दर्शन मिळालं नाही. दर्शनासाठी आलेल्या दोघांनाही आल्या पावली परत जाण्याची वेळ आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

उज्जैन : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना महाकाल मंदिर दर्शन मिळालं नाही. दर्शनासाठी आलेल्या दोघांनाही आल्या पावली परत जाण्याची वेळ आली. हिंदू संघटनांनी आलिया आणि रणबीर यांच्याविरोधात मंदिराबाहेर आंदोलन केलं. ज्यामुळे या दोघांनाही मंदिरात प्रवेश मिळाला नाही. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महाकाल मंदिराबाहेर हिंदू संघटनांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं.

जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग बाबा महाकालच्या धाममध्ये अभिनेता रणबीर कपूर-आलिया भट्ट यांना हिंदू संघटनांनी विरोध केला. या विरोधामुळे रणबीर आणि आलिया मंदिरात पोहोचू शकले नाहीत. प्रचंड विरोध होत असताना चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्मिती टीमने मंदिराच्या बाहेर भेट दिली. सुरक्षेमुळे रणबीर आणि आलियाला दर्शन न घेता इंदूरला जावं लागलं.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मंगळवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास महाकाल मंदिरात येणार असल्याची माहिती हिंदू संघटनांना मिळाली होती. 4 वाजल्यापासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते व्हीआयपी प्रवेशद्वाराजवळ जमा झाले. त्यांनी तिथे आंदोलन सुरू केलं. आलिया रणबीरला प्रवेश देण्यासाठी विरोध केला. पोलिसांनाही त्याची माहिती नव्हती.

प्रोडक्शन टीम आणि अधिकाऱ्यांचे वाहन वेळेवर प्रवेशद्वारावर पोहोचताच हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि आंदोलक यांच्यात वादावादी झाली. पोलिसांनी आंदोलकांना हुसकवून लावण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाची निर्मिती टीम आणि अयान मुखर्जी दिग्दर्शकाने बाबा महाकालचे दर्शन घेतले.

सिनेमाला चांगलं यश मिळावं यासाठी त्यांनी प्रार्थना केल्याचं सांगितलं. यावेळी आलिया आणि रणबीरला दर्शन घेता आलं नाही. पोलीस आणि आंदोलक यांच्यातील झालेल्या वादावादीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor