मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ranbir Kapoor आणि Alia Bhatt ने सुरू केलं लग्नाचं शॉपिगं? Viral होतोय हा Photo

Ranbir Kapoor आणि Alia Bhatt ने सुरू केलं लग्नाचं शॉपिगं? Viral होतोय हा Photo

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट काहीच दिवसात अर्थात पुढील महिन्यात एप्रिल 2022 मध्ये लग्न करू शकतात अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान या कपलने लग्नाची शॉपिंग करायला सुरुवात केली की काय असा सवाल चाहते काही व्हायरल फोटो समोर आल्यानंतर करत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 26 मार्च: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Alia Bhatt and Ranbir Kapoor marriage date) या कपलच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे 'गंगुबाई काठियावाडी' (Alia Bhatt Gangubai Kathiawadi), 'RRR' असे बॅक टू बॅक हिट देणारी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Latest Movies) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

शिवाय आलिया-रणबीर या कपलचे चाहते त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' (Alia Bhatt-Ranbir Kapoor Brahmastra) सिनेमासाठी देखील उत्सुक आहेत. आलिया आणि रणबीर हे कपल ऑनस्क्रीन आतापर्यंत एकत्र दिसलं नाही आहे. मात्र लवकरच ते 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहेत. आलियाच्या वाढदिवशी तिचा या सिनेमातील लुक देखील रीव्हिल करण्यात आला होता. मात्र ब्रह्मास्त्रबाबत आणखी अपडेट समोर येण्यासाठी या कपलच्या लग्नाबाबत अपडेट येऊ लागले आहेत. लेटेस्ट मीडिया रिपोर्टनुसार अशी माहिती मिळते आहे की, रणबीर-आलिया काहीच दिवसात अर्थात पुढील महिन्यात एप्रिल 2022 मध्ये लग्न करू शकतात. दरम्यान कोणतीही अधिकृत निश्चित तारीख समोर आलेली नाही आहे.

हे वाचा-Instagram Trend चं एवढं वेड की प्रेग्नंट असूनही अभिनेत्रीने केला डान्स, Video होतोय Viral

आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख नक्की झाल्याची चर्चा तर आहेच,  शिवाय त्यांनी शॉपिंगला सुरुवात केल्याचंही बोललं जात आहे. यामागचं कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटोज. हे कपल प्रसिद्ध ब्रायडल कांचीपुरम साडी ब्रँड सीमाती टेक्सटाइल्सच्या सीईओसह स्पॉट झालं आहे, त्यामुळे चाहते त्यांच्या लग्नाविषयी विचारत आहेत.

साडी खरेदीसाठी पोहोचले होते आलिया-रणबीर?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या साडी ब्रँडच्या सीईओ बीना कनन यांनी आलिया आणि रणबीरसह एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. चाहत्यांच्या मते हे कपलने लग्नाच्या शॉपिंगला सुरुवात केली आहे. या फोटोवर चाहत्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने विचारलं आहे की, लग्नाची तयारी करत आहात का? तर एका युजरने  ‘वेडिंग बेल्स’असं म्हटलं आहे. लवकरच हे कपल विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. इंडिया टूडेच्या वृत्तानुसार एप्रिल 2022 मध्येच आलिया-रणबीरचं लग्न होऊ शकतं.

First published:

Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor