Home /News /entertainment /

फुस्स! अखेर तीसुद्धा अफवाच; आलिया भट्टृ-रणबीर यांच्या लग्नाबद्दल काका रणधीर कपूर यांनी केला मोठा खुलासा

फुस्स! अखेर तीसुद्धा अफवाच; आलिया भट्टृ-रणबीर यांच्या लग्नाबद्दल काका रणधीर कपूर यांनी केला मोठा खुलासा

रणबीर कपूर (Ranbir kapoor) आणि आलिया भट्ट (Alia bhatt) आज लग्न करणार नसून त्यांचा आज साखरपुडा (Engagement) होणार असल्याची बातमीही केवळ अफवाच निघाली. रणबीरचे काका रणधीर कपूर काय सांगतायत वाचा..

    मुंबई, 30 डिसेंबर: बॉलीवूडमधील लव बर्ड रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांना काल मुंबईतील विमानतळावर स्पॉट केलं होतं.  यावेळी आलिया भट्ट रणबीर कपूरच्या कुटुंबीयांसोबत न्यू इयर साजरा करण्यासाठी राजस्थानला रवाना झाल्याचं समजतं. आलिया भट्टचं कुटुंबही सध्या राजस्थानमध्ये सुट्ट्यांसाठी गेलेलंआहे. त्यामुळं दोन्ही कुटुंबं आणि नातेवाईक एकत्र येत असल्याने हे लव्हबर्ड लग्न करणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या होत्या. त्यांचा साखरपुडा राजस्थानातल्या रिसॉर्टमध्ये होत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र यामध्ये कसलंही तथ्य नसल्याचं रणबीर कपूरचे काका अभिनेते रणधीर कपूर यांनी स्पष्ट केलं आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील विशेष रंगल्या होत्या. 2020 च्या सुरुवातीला अशी बातमी समोर आली होती की दोघे यावर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत, मात्र तसं झालं नाही. त्यामुळे आता New Year च्या मुहूर्तावर हे जोडपं विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता कपूर कुटुंबातल्या सदस्यानेच त्याचा इन्कार केला आहे. "कुठल्याही विवाह सोहळ्यासाठी नव्हे तर ते  फक्त न्यू इअर साजरं करण्यासाठी एकत्र जमले आहेत,"  असं रणधीर कपूर म्हणाले. रणधीर कपूर हे रणबीरचे मोठे काका आणि करिश्मा-करीनाचे वडील आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत  रणधीर कपूर यांनी सांगितलं की, 'हे जोडपं आणि त्यांचे कुटुंबीय फक्त सुट्टीसाठी राजस्थानमध्ये गेले आहेत.  ते दोघं तिथे लग्न करणार आहेत, यामध्ये काही तथ्य नाही. रणबीर आणि आलिया जर आज लग्न करणार असते तर एक कुटुंब म्हणून मीसुद्धा त्यांच्यासोबत असायला हवं होतं. रणबीर, आलिया आणि नीतू तिथे सुट्टीसाठी आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी  गेले आहेत." त्यांचा आज साखरपुडा होणार असल्याची बातमी चुकीची आहे, असंही त्यांनी सांगितलं. दीपिका-रणवीर यांची जोडीही काल मुंबई विमानतळावर दिसली होती. हे दोघेही जयपूरसाठी रवाना झाले आहेत. मात्र हा सर्व योगायोग असून ते दोघं आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाला उपस्थिती लावण्यासाठी गेले नाहीत, हेही आता स्पष्ट झालं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Alia Bhatt, Marriage, Ranbir kapoor

    पुढील बातम्या