Home /News /entertainment /

Alia Bhatt pregnancy: सुनेच्या गोड बातमीवर सासू नीतू कपूरची पहिली प्रतिक्रिया, हसत हसत म्हणाल्या...

Alia Bhatt pregnancy: सुनेच्या गोड बातमीवर सासू नीतू कपूरची पहिली प्रतिक्रिया, हसत हसत म्हणाल्या...

आलिया भट्टने तिच्या आई होण्याची खबर (Alia Bhatt announces her pregnancy with Ranbir Kapoor) आज सोशल मीडियावर शेअर केल्यावर सगळीकडून तिचं अभिनंदन केलं जात आहे. आलियाच्या सासूबाई म्हणजे नीतू कपूर यांनी या बातमीवर नक्की काय प्रतिक्रिया दिली?

पुढे वाचा ...
  मुंबई 27 जून: बॉलिवूडच्या नुकत्याच लग्न झालेल्या (Ranbir Kapoor) रणबीर कपूर आणि (Alia Bhatt) आलिया भट यांच्याकडे एक खरीखुरी गुड न्यूज आहे. एप्रिल महिन्यात आलिया आणि रणबीरने लग्नगाठ बांधली होती आणि आज आलियाने तिच्या सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तिच्या आई होण्याबद्दल (Alia Bhatt pregnancy) माहिती दिली आहे. तिच्या या पोस्टवर हजारोंमध्ये चाहत्यांनी कमेंट करत अक्षरशः पाऊस पाडला आहे. पण आलियाची सासू म्हणजे नीतू कपूर (Neetu Kapoor) यांची ही प्रतिक्रिया सगळ्यांपेक्षा सरस ठरत आहे. बॉलिवूडच्या कपूर खानदानात आलियाचं नुकतंच लग्न झालं. (Ranbir and Alia) रणबीर आणि आलिया पाच वर्ष रिलेशनशिप मध्ये होते आणि त्यानंतर एप्रिल महिन्यात दोघेही विवाह बंधनात अडकले. लग्नाला दोन महिने सुद्धा झाले नाहीत तर कपूर घराण्याच्या सुनेने आज तिच्या गरोदरपणबद्दल माहिती दिली आहे. आजच्या दिवसातली सगळ्यात आनंदाची बातमी म्हणून याकडे सगळे पाहत आहेत आणि सगळीकडे यावरच चर्चा चालू आहे. आलियाच्या सासूबाईंना सुद्धा याबद्दल विचारणा केल्यावर त्यांनी खूपच सुंदर पद्धतीने (Neetu Kapoor reaction on Alia Bhatt pregnancy) आपलं मत मांडलं. नीतू कपूर आता आजी होणार असल्याने फोटोग्राफर आणि प्रसार माध्यमांनी त्यांचं अभिनंदन केल्याचं एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावर नीतूजींनी मनापासून सगळ्यांचे आभार मानले. कपूर घराण्याचा ज्युनियर कपूर आता ऑन द वे आहे असं सुद्धा सगळीकडे म्हणलं जात आहे. ‘अरे वाह! सगळ्या भारताला समजलं का मी आजी होणार आहे?’ असा गमतीदार प्रश्नसुद्धा त्यांनी विचारला.
  तर Viral Bhayani च्या इन्स्टाग्राम पेजवरून सुद्धा एक खास विडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात फराह खान आणि करण कुंद्रा नीतूजींचं अभिनंदन करताना दिसत आहे. नीतू कपूर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान अजिबात लपत नाहीये.
  नीतू कपूर आपली नवी सून आलिया आणि मुलगा रणबीर याबद्दल कायमच मोकळेपणाने व्यक्त होताना दिसतात. ‘आलियामुळे माझ्या मुलाच्या आयुष्यात प्रेम आलं तिने त्याला योग्य प्रेम दिलं’ असं सुद्धा त्यांनी अनेकदा म्हणलं आहे. आपल्या सुनेबद्दल कौतुक करताना नीतू कपूर कधीच थकत नाहीत. हे ही वाचा- तिशीच्याआत आई होण्याची कपूरांच्या सुनांची परंपरा आलियानं कायम राखली! पण... सासूसारखी राहणार का सिनेसृष्टीपासून लांब?
   आलिया आणि रणबीर सध्या त्यांच्या वर्क फ्रंटवर सुद्धा जबरदस्त ऍक्टिव्ह आहेत. रणबीरचा ‘समशेरा’ हा चित्रपट जुलै महिन्यात येणार आहे तर आलिया आणि रणबीरची जोडी ब्लॉकबस्टर बिगबजेट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार आहे. आता ही प्रेग्नन्सीची बातमी खरंच खरी आहे की हा एक प्रमोशनल स्टंट आहे हे अजून तरी स्पष्ट झालं नाहीये. पण रणबीर आलिया दोघांसाठी हे वर्ष बरंच खास असणारे एवढं नक्की.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor

  पुढील बातम्या