मुंबई, 28 जानेवारी- आलिया भट्ट
(Alia Bhatt) आणि अजय देवगनच्या
(Ajay Devgan) बहुचर्चित 'गंगुबाई काठियावाडी'
(Gangubai Kathiawadi) च्या रिलीजची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या महिन्यात 6 तारखेला हा चित्रपट रिलीज होणार होता. परंतु कोरोना महामारीमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यांनतर आता चित्रपटाची नवी रिलीज डेट समोर आली आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. आलिया भट्टचा लुक आणि चित्रपटाचा टीजर पाहून चाहत्यांना कुतूहल वाटत आहे. आलियाने पहिल्यांदाच अशी भूमिका साकारली आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला नव्या रूपात पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. हा चित्रपट 6 जानेवारी 2022 मध्ये रिलीज होणार होता. परंतु कोरोना महामारीमुळे या चित्रपटाची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता या चित्रपटाची नवी रिलीज डेट समोर आली आहे. संजय लीला भन्साळी आणि पेन स्टुडिओ प्रस्तुत हा चित्रपट येत्या 25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
चित्रपटाची नवी रिलीज डेट समोर आल्याने पुन्हा एकदा चित्रपट चर्चेत आला आहे. आलिया भट्ट आणि अजय देवगनचे चाहतेसुद्धा फारच आनंदी झाले आहेत. महत्वाचं म्हणजे या चित्रपटाचं वर्ल्ड प्रिमीयर 72 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे. त्यामुळे सर्वच उत्सुक आहेत.
(हे वाचा: Vicky Kaushal आणि 'या' साऊथ अभिनेत्रीचं आहे खास नातं! तुम्हालाही वाटेल आश्चर्य)
संजय लीला भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडीनिमित्त आलिया भट पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर डॉर्क कॅरेक्टर साकारणार आहे. हा चित्रपट 60 च्या दशकातील मुंबईतील महिला माफिया गंगूबाईच्या जीवनावर आधारित आहे. गंगूबाई मुंबईतील कामाठीपुरामध्ये कोठा चालवत होती. या चित्रपटाची पटकथा हुसेन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन लिहिली गेली आहे. अभिनेता अजय देवगण देखील या चित्रपटात एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. अजय, गंगूबाईला बहीण मानणाऱ्या करीम लालाची भूमिका साकारणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.