आलियाच्या गाण्यावर पाकिस्तानी अभिनेत्रीनं लावला चोरीचा आरोप, काय आहे नेमकं प्रकरण?

आलियाच्या गाण्यावर पाकिस्तानी अभिनेत्रीनं लावला चोरीचा आरोप, काय आहे नेमकं प्रकरण?

भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणयात आली आहे. त्यामुळे सध्या पकिस्तानी कलाकार बॉलिवूडला निशाणा करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तानमध्ये खूपच तणावपूर्ण वातवरण आहे. भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणयात आली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानातही बॉलिवूड सिनेमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पकिस्तानी कलाकार बॉलिवूडला निशाणा करत आहेत. असंच काहीसं घडलंय अभिनेत्री अलिया भटसोबत. एका पाकिस्तानी अभिनेत्रीनं आलिया भटवर गाण्याच्या चोरीचा आरोप केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात आहे. तिनं आलिया भटच्या नव्या गाण्यावरुन ट्विटरवर अशा गोष्टी लिहिल्या आहेत. ज्या ऐकल्यावर सर्वांनाच धक्का बसेल.

पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात हिनं आलियाचं नवं पंजाबी साँग अल्बमवर टीका करणारं ट्वीट केलं. काही दिवसांपूर्वी आलियाच्या 'Prada' या गाण्याचा म्यूझिक व्हिडीओ रिलीज झाला. यातील तिच्या डान्स नंबरला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र आलियाच्या या गाण्यावर पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात नाराज आहे. तिनं चक्क आलियावर चोरीचा आरोप केला आहे.

Oops! ‘पछताओगे’ सक्सेस पार्टीमध्ये नोरा फतेहीला ड्रेसनं दिला दगा, VIDEO VIRAL

मेहविशचा म्हणणं आहे की, नुकतंच रिलीज झालेलं आलियाचं ‘Prada’ हे गाणं पाकिस्तानी अल्बम साँग ‘वाइटल साइन’ यांच्या ‘गोरे रंग का जमाना...’शी मिळता जुळता आहे. त्यामुळे आलियाचं हे गाणं पाकिस्तानी गाण्यावरुन चोरल्याचा दावा मेहविशनं केलं आहे. मेहविश तिच्या ट्विटरवर लिहिलं, हे खूपच आश्चर्यकारक आहे. एकीकडे बॉलिवूड प्रत्येक वेळी पाकिस्तानला बोलत असतं. आमचा अपमान करतं, तर दुसरीकडे हेच लोक आमच्या गाण्यांची चोरी करत आहेत. कॉपीराइट्सचं उल्लंघन आणि रॉयल्टीची भरपाई याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाही.

स्टेशनवर गाणं गात स्टार झालेल्या रानू मंडलला सलमाननं दिलं 'एवढ्या' लाखांचं घर!

या अगोदर मेहविशनं शाहरुख खानची वेब सीरिज 'बार्ड ऑफ ब्लड' बाबत वादग्रस्त ट्वीट केलं होतं. तिनं 'बार्ड ऑफ ब्लड'ला टॅग करत लिहिलं, आता आम्ही जागू शकतो? आणि बॉलिवूडचा अजेंडा समजून घेऊ शकतो की हे काय चाललं आहे. शाहरुख खान तु देशभक्त हो, त्यासाठी तुला कोणीही रोखू शकत नाही. पण फक्त आमचा अपमान करावा यासाठी हे सर्व करु नकोस.

बॉलिवूडमध्ये 31 वर्षं पूर्ण करणाऱ्या या सुपरस्टार अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का?

======================================================

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 05:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading