रणबीर आणि आलियाच्या नात्याबद्दल काय म्हणाले ऋषी कपूर?

रणबीर आणि आलियाच्या नात्याबद्दल काय म्हणाले ऋषी कपूर?

आता पप्पा ऋषी कपूरनं मिडडे या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच आपलं तोंड उघडलंय.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नात्याची चर्चा बाॅलिवूडमध्ये जोरात सुरू आहे. दोघांची बाॅडी लॅंग्वेज, जुळणारी केमिस्ट्री याबद्दल तर बरंच काही आपण ऐकतो, पाहतो. पण आतापर्यंत त्यांच्या घरातले यावर काही बोलत नव्हते. पण आता पप्पा ऋषी कपूरनं मिडडे या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच आपलं तोंड उघडलंय. ते म्हणाले, ' जे काही आहे ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. खरं तर रणबीर आता 35शीत आहे. मी 25 वर्षांचा असताना माझं लग्न झालं होतं. रणबीरनं तर आता ताबडतोब लग्न करावं. म्हणजे आम्हाला नातवंडांशी खेळता येईल. '

ऋषी कपूर म्हणाले, रणबीरला सिने इंडस्ट्रीतल्याच मुली भेटतात. त्यामुळे तो त्यातलीच निवडेल. घरात रणबीरच्या मागे त्याची आई लग्नाचा तगादा लावत असते, असंही ते म्हणाले. पण रणबीर यापासून नेहमी दूर पळतो.

मध्यंतरी, ऋषी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून आपण भट परिवारातील बहुतांश चांगल्या लोकांसोबत काम केल्याचं लिहिलं.यात महेश भट्ट, मुकेश भट्ट, रोबिन भट्ट, पूर्णिमा जी, पूजा भट्ट, आलिया भट्ट या सगळ्यांसोबत काम केल्याचं सांगितलं.

मात्र अचानक ऋषी यांनी भट्ट कुटुंबाचे आभार मानल्याने त्याचा संबंध आलिया आणि रणबीरच्या फुलत असलेल्या नात्याशी तर नाही ना असा तर्क काही नेटीझन्सनी लावला.

First published: July 23, 2018, 11:55 AM IST

ताज्या बातम्या