S M L

काय आहे सलमानच्या फिटनेसचं रहस्य?

सलमान त्याच्या कोणत्याही सिनेमाचं शूटिंग सुरू होण्यापूर्वी जवळपास तीन महिने तरी जीममध्ये दररोज घाम गाळतो.

Sonali Deshpande | Updated On: Dec 8, 2017 01:14 PM IST

काय आहे सलमानच्या फिटनेसचं रहस्य?

06 डिसेंबर : दबंग खान सलमान नेहमीच त्याच्या सिनेमांतून चाहत्यांना खूश ठेवण्यासाठी मेहनत घेताना दिसतो. नुकताच दिग्दर्शक अली अब्बास जफरने सलमानचा वर्कआऊट करतानाचा फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय.

या फोटोसोबत अलीने भाईजानच्या फिटनेस सिक्रेटबाबत एक खुलासा केलाय. सलमान त्याच्या कोणत्याही सिनेमाचं शूटिंग सुरू होण्यापूर्वी जवळपास तीन महिने तरी जीममध्ये दररोज घाम गाळतो.एवढंच नाही तर सलमानने त्याच्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान बर्फाळ प्रदेशात फिटनेस टिकवण्यासाठी  दहा किलोमीटर सायकलिंग केल्याचंही सांगितलंय. शिवाय सलमान रोज हलकाफुलका आहार घेतो. आणि त्याचं जेवणही फार लवकर आटोपतं.

Loading...
Loading...

आज 52व्या वर्षीही सलमान हिरोच्या भूमिकेत लोकप्रिय आहे. त्याचा सिनेमा हिट असतोच. पण त्यामागची त्याची मेहनत भरपूर असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 01:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close