Home /News /entertainment /

OMG! अभिनेत्रीच्या घरात होत भूत, राहणं ही झालं होतं कठीण; पाहा काय होता धक्कादायक प्रकार

OMG! अभिनेत्रीच्या घरात होत भूत, राहणं ही झालं होतं कठीण; पाहा काय होता धक्कादायक प्रकार

'...आणि असं काहीतरी मला स्पर्श करून गेलं' अभिनेत्रीने त्या धक्कादायक प्रसंगाचं वर्णन करत सांगितला अनुभव.

  मुंबई 17 जून : भुत म्हटलं की कोणाच्याही चेहऱ्यावरचा रंग बदलतो. पण एक भुत चक्क अभिनेत्रीच्या घरात राहत होतं. बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री अलाया फर्निचरवालाच्या (Alaya F) घरात हे भूत राहत होतं. असा खुलासा चक्क अभिनेत्रीनेचं केला आहे. एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला आहे. अभिनेत्री पूजा बेदीची (Pooja Bedi) मुलगी अलायाने नुकतच बॉलिवूडमध्ये (Bollywood) पाऊल ठेवलं आहे. पण पहिल्याच चित्रपटापासून तिने सगळ्यांकडून कौतुक मिळवलं आहे. तर आता तिने एका मुलाखतीत तिच्या घरात भूत राहत होतं असा खुलासा केला आहे. ती म्हणाली, “मी न्यूयॉर्कला ज्या घरात राहूण अभ्यास कारायची तिथे भुतही राहत होतं. अर्ध्या रात्री मला पावलांचे आवाज यायचे. तर कधी कधी आपोआप शॉवर चालू व्हायचा. अनेक भयावह गोष्टी घडायच्या.”
  View this post on Instagram

  A post shared by ALAYA F (@alayaf)

  पुढे अलाया म्हणाली की, “एक दिवस मला लाईटच्या प्रकाशातून काहीतरी निघाल्यासारखं वाटलं. आणि माझी अवस्था अशी झाली होती की तु काही पाहीलसं का..? आणि मी म्हणाले, मी काही नाही पाहिलं..  मला असं वाटलं काहीतरी मला स्पर्श करून गेलं. तेव्हा मला वाटलं काहीतरी गडबड आहे. मला घरी अजिबात जावसं वाटत नव्हतं.”
  View this post on Instagram

  A post shared by ALAYA F (@alayaf)

  अलायाने नितिन कक्करच्या ‘जवानी जानेमन’ (Jawani Janeman)  चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाउल ठेवलं होतं. पहिल्याच चित्रपटातून तिने चांगली शाबासकीही मिळवली. इतकच नव्हे तर फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवॉर्डही मिळालं.

  PHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..'

  अलाया कमी काळातच तरुणाईची आवडती अभिनेत्री बनत आहे. सोशल मीडियावरही तिची चांगली फॅनफॉलोइंग आहे. ती नेहमीच तिचे निरनिराळे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. याशिवाय ती एक योग साधक आहे. नियमीत योगा ती करते. त्यामुळे ती अतिशय फिट आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment

  पुढील बातम्या