Home /News /entertainment /

VIDEO: ट्रेंडिग गाण्यावर अक्षया आणि सिद्धार्थचा धमाकेदार REEL! दोघांचा LOOK पाहून नेटकरी म्हणाले...

VIDEO: ट्रेंडिग गाण्यावर अक्षया आणि सिद्धार्थचा धमाकेदार REEL! दोघांचा LOOK पाहून नेटकरी म्हणाले...

अभिनेत्री अक्षया देवधरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे.

  मुंबई, 18 जानेवारी-   सध्या सोशल मीडियावर   (Social Media)  मोठ्या प्रमाणात रील्सची   (Reels)  चलती आहे. एखाद्या ट्रेंडिंग गाण्यावर   (Trending Song)   कलाकाराने रील्स बनवलं नाही असं होणारचं नाही. यामध्ये अभिनेत्री अक्षया देवधरचंसुद्धा   (Akshyaa Devdhar)   नाव आघाडीवर आहे. अक्षया नेहमीच ट्रेंडिग गाण्यावर सुंदर सुंदर रील्स बनवून शेअर करत असते. चाहतेसुद्धा तिला प्रचंड दाद देत असतात. अशात एखाद्या रीलसाठी अभिनेत्रीला सिद्धार्थ जाधवची   (Sidharth Jadhav)  साथ मिळाली तर? धम्माल होणार हे नक्की, हो ना? सध्या सोशल मीडियावर सिद्धू आणि अक्षयाचा असाच एक जबरदस्त रील पाहायला मिळत आहे. अभिनेत्री अक्षया देवधरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ खरं तर एक रील आहे. सध्या एखादं गाणं ट्रेंडिंग होतं. आणि सर्वसामान्य तरुणांप्रमाणे कलाकारांनासुद्धा त्या गाण्यावर रील्स बनवण्याचा मोह आवरत नाही. असंच काहीसं आलं आहे, अक्षया देवधर आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव बाबतीत. सध्या सोशल मीडियावर, 'डूब गयी में तुझमे...' हे गाणं प्रचंड ट्रेंड करत आहे. ध्वनी भानुशालीच्या या गाण्यावर आणि हुक स्टेपवर प्रचंड रील्स बनवले जात आहेत. यामध्ये आता अक्षया आणि सिद्धूचादेखील समावेश झाला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

  अक्षया देवधरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सिद्धार्थ जाधवसोबत या ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहे. यामध्ये दोघांनी खूपच चॅन डान्स मूव्ह्स केल्या आहेत. तसेच दोघांनीही मल्टीकलर सूटबूट घातला आहे. या दोघांना अशा ड्रेसमध्ये पाहून चाहत्यांना रणवीर सिंहची आठवण येत आहे. चाहते हा व्हिडीओ पाहून सिद्धू आणि अक्षयाचं कौतुक करत आहेत. तर काही नेटकरी मजेशीर कमेंट्सयुद्ध देत आहेत. एकीने कमेंट करत अक्षयाला म्हटलं आहे, 'लेडी रणवीर सिंह', तर दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे, 'मला तर करण जोहर वाटले', आणखी तिसऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे, 'रणवीर सिंहने तर पाठक बाईंनापण बदलून टाकलं, तर आणखी एकाने म्हटलं, 'अरे रणवीर पाठक', अशा विविध कमेंट्स करत चाहते त्यांच्या या व्हिडीओला दाद देत आहेत. (हे वाचा:माझी तुझी रेशीमगाठ फेम नेहाची रिअल लाईफ नवऱ्यााठी खास पोस्ट चर्चेत) हा व्हिडीओ 'हे तर काहीच नाय' या कार्यक्रमाच्या सेटवरील आहे. सध्या झी मराठीवर 'हे तर काहीच नाय' हा भन्नाट कार्यक्रम आपल्या भेटीला येतो. यामध्ये सिद्धार्थ आणि अक्षया एकत्र पाहायला मिळतात. अक्षया यामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे. तर सिद्धार्थ परीक्षकाच्या. या कार्यक्रमात कलाकारांपासून विनोदवीरांपर्यंत अनेक सेलेब्रिटी उपस्थिती लावतात. ते फक्त उपस्थितीच नाही दर्शवत तर आपल्या सोबत घडलेले अनेक मजेशीर किस्से सांगत असतात. त्यामुळे या कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee Marathi

  पुढील बातम्या