मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अक्षया देवधरचं लडाखमध्ये 'परमसुंदरी'; गर्ल गॅंगचा धम्माल VIDEO झाला VIRAL

अक्षया देवधरचं लडाखमध्ये 'परमसुंदरी'; गर्ल गॅंगचा धम्माल VIDEO झाला VIRAL

‘पाठक बाई’ (Pathak Bai) अर्थातच अक्षया देवधर आपल्या सर्वांचीच लाडकी बनली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांना मोठी भुरळ घातली होती.

‘पाठक बाई’ (Pathak Bai) अर्थातच अक्षया देवधर आपल्या सर्वांचीच लाडकी बनली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांना मोठी भुरळ घातली होती.

‘पाठक बाई’ (Pathak Bai) अर्थातच अक्षया देवधर आपल्या सर्वांचीच लाडकी बनली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांना मोठी भुरळ घातली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 1ऑक्टोबर- 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jiv Rangla) फेम अंजली अर्थातच अक्षया देवधरने (Akshaya Devdhar) चक्क लडाखमध्ये 'परामसुंदरी' गाण्यावर धम्माल केली आहे. तिची एकटीच नाही तर पूर्ण गर्ल गॅंगसोबत अक्षयाने जबरदस्त डान्स केला आहे. इतकंच नव्हे तर यावेळी अक्षयासोबत संपूर्ण गर्ल गॅंगने साडी परिधान केली आहे. हा सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

‘पाठक बाई’ (Pathak Bai) अर्थातच अक्षया देवधर आपल्या सर्वांचीच लाडकी बनली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांना मोठी भुरळ घातली होती. यातील राणा आणि अंजली म्हणजेच पाठक बाईची जोडी खुपचं प्रसिद्ध झाली होती. या मालिकेने काही महीन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र तरीसुद्धा मालिकेच्या कलाकारांची क्रेझ अजूनही कायम आहे. हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. अक्षयासुद्धा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाली आहे. फक्त फोटोच नव्हे तर सुंदर रिल्स माध्यमातून अक्षया रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते.

(हे वाचा:VIDEO: 'मला म्हणत्यात हो पुण्याची मैना' 'अंजली' फेम अक्षयाचा पुणेरी ... )

अक्षयाचा VIRAL VIDEO-

नुकताच अभिनेत्री अक्षया देवधरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एक इन्स्टाग्राम रील आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अक्षया देवधर आपल्या मैत्रिणींसोबत 'परमसुंदरी' या 'मिमी' फेम गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत. ही गर्ल गॅंग चक्क साडीमध्ये आहे. इतकंच नव्हे तर विशेष म्हणजे हा डान्स या गर्ल गॅंगने लडाखच्या 'पांगोग त्सो' तलाव किनाऱ्यावर केला आहे. अक्षयासोबतच संपूर्ण गर्ल गॅंगला लडाखमध्ये साडीत पाहून चाहते इम्प्रेस झाले आहेत. हा व्हिडीओ अक्षयाच्या लेह-लडाख ट्रिप दरम्यानचा आहे. अभिनेत्रीने आपल्या मैत्रिनींसोबत या ट्रीपमध्ये किती धम्माल केली आहे, हे या व्हिडीओवरूनचं स्पष्ट होतं.

(हे वाचा:अक्षया देवधरचं 'याड लागलं'; सोशल मीडियावर VIDEO होतोय VIRAL ... )

'तुझात जीव रंगला' मालिकेमुळे अंजली म्हणजेच मूळची पुण्याची असणारी अक्षया देवधर घराघरात पोहोचली आहे.काही महिन्यांपूर्वीच तुझात जीव रंगला मालिकेने निरोप घेतला असला तरी अंजली आणि राणाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.अक्षयाला या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. अक्षया सध्या रिल्सच्या माध्यमातून रसिक प्रेक्षाकांचं मनोरंजन करत आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment