Home /News /entertainment /

कोरोना चाचणी करताना अभिनेत्रीची आरडाओरड; Video पाहून व्हाल थक्क

कोरोना चाचणी करताना अभिनेत्रीची आरडाओरड; Video पाहून व्हाल थक्क

ती कोरोना चाचणी देताना दिसत आहे. (Testing for COVID-19) लक्षवेधी बाब म्हणजे ही टेस्ट देताना तिनं कमालीचा आरडाओरडा केला. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

  मुंबई 10 एप्रिल: अक्षरा सिंग (Akshra Singh) ही भोजपूरी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. भोजपूरी चित्रपटांसोबत तिनं काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळं देशभरातील लाखो चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. अक्षरा देखील आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओज शेअर करताना दिसते. यावेळी देखील तिनं असाच एक गंमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती कोरोना चाचणी देताना दिसत आहे. (Testing for COVID-19) लक्षवेधी बाब म्हणजे ही टेस्ट देताना तिनं कमालीचा आरडाओरडा केला. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. अक्षरा लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव अंगूठा छाप असं आहे. नुकतंच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. परंतु शूटिंग सुरु करण्यापूर्वी सेटवरील सर्व कलाकारांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. दरम्यान या टेस्टची प्रोसेस पाहूनच अक्षराला घाम फुटला. तिला खूपच भीती वाटू लागली. अन् या भीतीपोटीच ती टेस्ट देताना आरडाओरडा करु लागली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अवश्य पाहा - ‘तुला अंतर्वस्त्र पाठवू का?’; अनुषा दांडेकरनं ट्रोलर्सची बोलती केली बंद
  कोरोनाचा थैमान सुरुच; 24 तासांत 794 रुग्णांचा मृत्यू देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल एक लाख 45 हजार 384 नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत 77 हजार 567 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. 24 तासांत 794 म्हणजेच जवळपास 800 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 32 लाख 5 हजार 926 इतकी झाली आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Bollywood actress, Coronavirus symptoms, Covid-19, Covid-19 positive

  पुढील बातम्या