Elec-widget

एकेकाळी 'हँडसम बॉय' असलेला अक्षय खन्ना आता दिसतो असा, PHOTO VIRAL

एकेकाळी 'हँडसम बॉय' असलेला अक्षय खन्ना आता दिसतो असा, PHOTO VIRAL

अक्षय खन्नाचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये अक्षयला ओळखणंही कठीण झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट :late बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या लुक्ससाठी नेहमीच खूप जागरुक असतात. बॉलिवूड कलाकार सुंदर दिसण्यासाठी सर्जरी आणि काय काय करतात. मात्र काही कलाकार असेही आहेत ज्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र ते आपल्या लुककडे जास्त लक्ष देत नाहीत. ते फक्त त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. असाच एक अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. नुकतेच अक्षयचे काही फोटो समोर आले ज्या पाहिल्यावर अनेकांना धक्का बसला. या फोटोंमध्ये अक्षय खन्नाला ओळखणंच कठीण झालं होतं. हे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी अक्षयला वेगवेगळे सल्ले द्यायल सुरुवत केली आहे.

अक्षय खन्ना लवकरच ‘सेक्शन 375’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटील येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशननंतर अक्षय कुमार कॅमेरात कैद झाला. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्या फोटोंमध्ये अक्षयला ओळखणंही कठीण झालं आहे. त्यावरुन त्याच्या चाहत्यांनी त्याला वेगवेगळे सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. अक्षय खन्नाचे हे फोटो फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

'तेरी मेरी कहानी'नंतर हिमेशाच्या सिनेमासाठी रानूनं गायलं दुसरं गाणं, पाहा VIDEO

एका युजरनं लिहिलं, ‘क्या से क्या हो गया’ तर आणखी एक युजरनं अक्षय तू हेअर ट्रान्सप्लांट का करुन घेत नाहीस असा प्रश्न विचारला आहे. या फोटोंमध्ये अक्षयच्या केसांसोबतच त्याचं वजनही खूप कमी झालेलं दिसत आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. तर अनेकांनी आजच्या जगात अक्षय स्वतःला फिट का ठेवत नाही असं थेट प्रश्न विचारला आहे.

Loading...

हार्दिक पांड्याची विकेट घेणारी नताशा आहे तरी कोण ?

अक्षय खन्नाचा 'सेक्शन 375' हा सिनेमा लवकरच प्रेक्षाकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तो एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या सिनेमात अभिनेत्री रिचा चढ्ढाचीही महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अजय बहलनं केलं असून हा सिनेमा भारतीय दंड संहिता कलम 375 वर आधारित आहे.

दिशा पाटनीनं सलग 4 फोटो इन्स्टाग्रामवर केले पोस्ट, शेअर केला 'हा' मेसेज

=============================================================================

हिटलरसमोर जर्मनीला धूळ चारणारे मेजर ध्यानचंद यांची रोमहर्षक कहाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Aug 30, 2019 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...