मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Akshaya Hardeek Haldi: राणा दा पाठक बाईंचे हळदीचे खास फोटो; ग्रँड हळदी सेलिब्रेशनची पहिली झलक पाहाच

Akshaya Hardeek Haldi: राणा दा पाठक बाईंचे हळदीचे खास फोटो; ग्रँड हळदी सेलिब्रेशनची पहिली झलक पाहाच

अक्षया हार्दीक हळद

अक्षया हार्दीक हळद

हार्दीक जोशी आणि अक्षया देवधर यांची आज हळद आहे. दोघांचा हळदी स्पेशल लुक समोर आलाय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 01 डिसेंबर : टेलिव्हिजनची प्रसिद्ध जोडी म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दीक जोशी.  तुझ्यात जीव रंगला म्हणत दोघांना टेलिव्हिजनचा पडदा गाजवला. मालिकेच्या सेटवर जुळलेल्या या गाठी आणि आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहेत. राणा दा आणि पाठक बाई उद्या म्हणजेच 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान दोघांची लगीन घाई सर्वांना पाहायला मिळत आहे. काल मुंबईत हार्दीकची हळद पार पडली. तर आज पुण्यात दोघांची एकत्र हळद पार पडणार आहे. त्याआधी दोघांचा हळदी लुक समोर आला आहे. लाडके राणा आणि अंजली या लुकमध्ये खूपच गोड दिसत आहेत.

हार्दीक आणि अक्षया हे पुण्याच्या प्रसिद्ध ढेपे वाड्यात शाही विवाह सोहळा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच ढेपे वाड्यात हळदी समारंभानं दोघांच्या लग्नाला सुरूवात होणार आहे. दोघांनी हळदीसाठी सफेद रंगाची थीम निवडली आहे. आज 1 डिसेंबरच्या मुहूर्तावर दोघांची हळद थाटामाटात रंगणार आहे. सगळे जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळी दोघांच्या लग्नासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. त्या दोघांचा हळदी लुक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - Hardeek - Akshaya: राणादाला हळद लागली तर पाठकबाईही सजल्या; 'अहा' च्या लग्नाला दणक्यात सुरुवात

हार्दीकनं दोघांचा वेलकम व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात दोघांनी सफेद रंगाचे कपडे घातले आहेत. त्यातही दोघांनी हळदीसाठी पंजाबी लुक ठरवला आहे. अक्षयानं सुंदर सफेद रंगाचा डिझाइनर पंजाबी ड्रेस कॅरी केलाय. तर हार्दीक पंजाबी स्टाइल क्लोज लेक सफेद कुडता पायजमा कॅरी केला आहे. दोघे त्यांच्या वेलकम पोस्टर जवळ फोटोशूट करताना दिसत आहेत. तर अक्षयानं हळदीची सुंदर सफेद फुलांची ज्वेलरी देखील घातली आहे. तसंच दोघांनी पंजाबी स्टाइल मोजडी देखील कॅरी केल्यात.  अक्षयाची हेअर स्टाइलही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

मुंबईमध्ये हार्दीक जोशीची हळद झाली. हळदीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर दुसरीकडे अक्षयाचं ग्रहमख सोहळाही पार पडला.

तसंच तिचा मेहंदी सोहळाही अगदी थाटात पार पडला. अक्षयाच्या मेहंदीनं सर्वांचं लक्ष वेधलं. अभिनेत्रीनं कस्टमाइज मेहंदी तिच्या हातावर रंगवली आहे. अगदी नवरा नवरीपासून, सप्तपदी देखील तिनं हातावर लिहून घेतली आहे. तिच्या मेहंदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Wedding