मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Akshay Waghmareला झाला होता डेंग्यू, पोस्ट शेअर करत दिला हेल्थ अपडेट

Akshay Waghmareला झाला होता डेंग्यू, पोस्ट शेअर करत दिला हेल्थ अपडेट

अक्षय वाघमारे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. डेंग्यू झाल्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. अशातच अक्षयनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या प्रकृतीविषयी अपडेट शेअर केली आहे.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 7 ऑगस्ट : फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप यांसारख्या चित्रपटांतून अभिनेता अक्षय वाघमारेनं (Akshay Waghmare) आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. अभिनयाच्या जोरावर त्यानं प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं आहे. अशातच अक्षय वाघमारे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. डेंग्यू झाल्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. अशातच अक्षयनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या प्रकृतीविषयी अपडेट शेअर केली आहे. अक्षय वाघमारे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो. त्याच्यासंबंधीत प्रत्येक गोष्ट तो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करतो. गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षयला डेंग्यू झाला होता त्यामुळे त्याचे चाहते चिंतीत होते. अशातच अक्षयनं त्याच्या प्रकृतीविषयीची अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अक्षयनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, 'फ्रेंड्स काही दिवसांपूर्वी मला डेंग्यू झाला होता आणि आता मात्र डेंग्यू मधून मुक्त झालो आहे, तब्येत एकदम छान पणे सुधारत आहे. आपले प्रेम व आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू द्या'.
अक्षय पुढे म्हणाला की, 'काळजी घ्या आपली व आपल्या स्वकीयांची कारण कोणताही आजार हा शेवटी त्रासदायकच ...तेव्हा काळजी घेतलेली बरी'. त्यामुळे अक्षयनं त्याच्या चाहत्यांनाही काळजी घेण्यासाठी सांगितलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्याही कमेंट पहायला मिळत आहे. 'काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा', असं चाहते म्हणत आहेत. हेही वाचा -  Rakhi Sawant : 'तू खूप भयानक दिसतेस'; राखीला नो-मेकअप लुकमध्ये पाहून नेटकरी हैराण दरम्यान, अक्षय वाघमारेने अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी हिच्याशी लग्न केलं. दगडी चाळीत झालेलं दोघांचं लग्न त्यावेळी माध्यमांसह लोकांमध्ये चर्चेचा विषय होता. आता त्या दोघांनाही एक गोंडस मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव अर्णा आहे. दोघेही लेकीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
First published:

Tags: Health, Instagram post, Marathi cinema, Marathi entertainment

पुढील बातम्या