अक्षयनं शेअर केलं 'टाॅयलेट एक प्रेमकथा'चं पोस्टर

अक्षयनं शेअर केलं 'टाॅयलेट एक प्रेमकथा'चं पोस्टर

खिलाडी अक्षय कुमारनं आपल्या 'टाॅयलेट एक प्रेमकथा' सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलंय.

  • Share this:

31 मार्च : खिलाडी अक्षय कुमारनं आपल्या 'टाॅयलेट एक प्रेमकथा' सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलंय. पोस्टरवर अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकरही आहे.

अक्षय आणि भूमी यांचा एकत्र असलेला हा पहिलाच सिनेमा. दिग्दर्शक नारायण सिंगनं सिनेमा दिग्दर्शित केलाय. पोस्टरवर अक्षय आणि भूमी वर-वधूच्या वेषात दिसतायत.आणि पोस्टरवर स्वच्छता अभियानचा संदेश आहे.

अक्षय कुमारनं म्हटलंय, ' 11 आॅगस्टला सिनेमा रिलीज होतोय.या सिनेमात अनोखी प्रेमकहाणी आहे. तेव्हा तयार व्हा स्वच्छ स्वातंत्र्यासाठी.'

या सिनेमाच्या शूटिंगची सुरुवात मधुरेत झाली. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्येही सिनेमाचं शूट झालंय.

First published: March 31, 2017, 1:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading