शाहरूख,सलमान अक्षय सर्वात श्रीमंत सेलिब्रिटीज्

फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत शाहरूख खान ,सलमान खान आणि अक्षय कुमार जगातल्या सर्वाधिक कमावणाऱ्या 100सेलिब्रिटींच्या यादीत झळकलेत.

Sonali Deshpande | Updated On: Jun 13, 2017 06:32 PM IST

शाहरूख,सलमान अक्षय सर्वात श्रीमंत सेलिब्रिटीज्

13 जून : फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत शाहरूख खान ,सलमान खान आणि अक्षय कुमार जगातल्या सर्वाधिक कमावणाऱ्या 100सेलिब्रिटींच्या यादीत झळकलेत.ही यादी मागच्या वर्षीच्या कमाईवरून ठरवण्यात आलीय.

तर शाहरूख खान  या यादीत 65व्या नंबर वर आहे. त्याने 2016 साली 38 दशलक्ष डॉलर्स अर्थात 245कोटी रूपये कमवलेत .त्याचे मागच्या वर्षी फॅन आणि डियर जिंदगी हे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत.

त्याच्यानंतर लागलाय नंबर दबंग खान -सलमान खानचा .सल्लुमिया या यादीत 71व्या क्रमांकावर आहे. त्याचा गेल्या वर्षी सुलतान हा एकच सिनेमा रिलीज झालाय. त्याने 37 दशलक्ष डॉलर्स कमावले.

आणि गेल्या वर्षी एयरलिफ्ट,रुस्तुम आणि हाऊसफुल 3 सारखे  दर्जेदार सिनेमे देणारा अक्षय कुमार या यादीत 81व्या नंबरवर आहे . त्याने 35.5 दशलक्ष डॉलर्स कमवले. या यादीत  130 दशलक्ष डाॅलर्स कमावणारा अमेरिकेचा सीन कोम्बस अव्वल ठरलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2017 06:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close