Home /News /entertainment /

रामसेतुसाठी फिल्म सिटीत भव्यदिव्य सेट; पुढील महिन्यात चित्रिकरणाला होणार सुरुवात

रामसेतुसाठी फिल्म सिटीत भव्यदिव्य सेट; पुढील महिन्यात चित्रिकरणाला होणार सुरुवात

#Ramsetu चित्रनगरी म्हणजेच मुंबई फिल्मसीटीत (Filmcity) चित्रपटाचा भव्यदिव्य असा सेट उभारण्यात आला आहे. पुढील महिन्यापासून चित्रपटाचं शुटींग सुरू होणार नाही.

  मुंबई 22 मे : अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी बिग बजेट चित्रपट ‘रामसेतु’ (Ramsetu) सध्या फार चर्चेत आहे. पण कोरोनाच्या तसेच लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचं चित्रीकरण बंद आहे. पण आता लवकरचं चित्रीकरण सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. चित्रनगरी म्हणजेच मुंबई फिल्मसीटीत (Filmcity) चित्रपटाचा भव्यदिव्य असा सेट उभारण्यात आला आहे. मोठा गुहांचा सेट उभारण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली  आहे.

  मंदिरा बेदीकडे आहे तरुणींनाही लाजवेल असा फिटनेस; फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकीत

  चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक अभिषेक शर्मा करणार आहेत. यासोबतच अक्षय कुमारसह अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीझ (Jacqueline Fernandez) , नुशरत भरूचा (Nushrat Bharucha) यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  चित्रपटात व्हीएफएक्स (vfx) आणि अनिमेशनचं (animation) सुद्धा मोठ्या प्रमाणात काम दिसू येणार आहे. त्यामुळे या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. तसेच चांगल्या प्रतिचे व्हीएफएक्स वापरले जाणार आहेत. यावर चित्रपटाची टीम काम करत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Ramsetu (@ramsetuthemovie)

  चित्रपटाचं चित्रिकरण हे  निरनिराळ्या ठिकाणांवर होणार आहे. मुंबईसह श्रीलंकेतही शुट होणार आहे. पुढच्या काही दिवसात सप्टेंबर-ऑक्टोंबर दरम्यान या चित्रपटाचे कलाकार आणि क्रू-मेंबर्स श्रीलंकेत जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपटाच्या टीम कडून या सगळ्या गोष्टींची आता आखणी केली जात आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Ramsetu (@ramsetuthemovie)

  अक्षयच्या या बिग बजेट चित्रपटासाठी त्याचे चाहते फारच उत्सुक आहेत. तसेच अक्षयच्या बहूप्रतिक्षित चित्रपटांमधील एक चित्रपट रामसेतु आहे. चित्रपटात साउथचा एक मोठ सुपरस्टार देखिल दिसणार असल्यांच म्हटलं जात आहे. पण अद्याप ते नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Akshay Kumar, Jacqueline fernandez, Marathi entertainment

  पुढील बातम्या