नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील कलाकारांच्या कमाई ऐकूनच आपले डोळे मोठं होतात. अनेक मोठे स्टार्स हिट झाल्यानंतर एका चित्रपटासाठी कोटींमध्ये पैसे आकारतात. त्यामुळे अशा कलाकारांचं बँक बॅलेन्सही तगडं असतं. अशातच फोर्ब्सने सर्वाधित कमाई करणाऱ्या स्टार्सची यादी जाहीर केली आहे.
या यादीत बॉलिवूडस्टार अक्षय कुमार याचा चढता आलेख दिसून येत आहे. फोर्ब्सने 2020 मधील सर्वाधित कमाई करणारे टॉप 10 स्टार्सची यादी जारी केली आहे. या यादीनुसार यंदाच्या वर्षीही पहिल्या क्रमांकावर WWE चे सुपरस्टार द रॉक कायम आहेत. गेल्या वर्षीही द रॉक सर्वाधिक जास्त कमाई करणाऱ्या सुपरस्टार्सच्या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर होते. फोर्ब्सने ही यादी जून 2019 पासून जून 2020 पर्यंतच्या टाइम पीरियडमध्ये जगभरातील सेलिब्रिटींच्या सर्वाधित जास्त कमाईच्या आधारावर जारी केली आहे. यामध्ये यावर्षी द रॉक 87.5 मिलियन डॉलरच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहेत. या यादीत बॉलीवुड सुपरस्टार अक्षय कुमार याचं नावही सामील आहे.
अक्षय कुमार एकमेव भारतीय भारतीय सुपरस्टार आहेत ज्यांचं नाव जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्सच्या टॉप-10 यादीत सामील झालं आहे. त्यांनी केवळ भारतीयचं नाही तर हॉलीवुडमधील अनेक दिग्गजांनाही मागे सोडलं आहे. अक्षय कुमार 48.5 मिलियन डॉलरच्या कमाईसह या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. प्रोफेशनल रेसलिंगमध्ये आपल्या अवघड मूव्सने सर्वांच्या मनात जागा करणारे द रॉक हॉलीवूडमधील सुपरस्टार झाले आहेत. कमाईच्या बाबतीत त्यांच्याजवळपासही कोणी जाऊ शकत नाही. द रॉक बऱ्याच वेळेपासून WWE च्या रिंगमध्ये दिसले नाही. सातत्याने चित्रपटांचं शूटिंग सुरू असल्याने त्यांना WWE मध्ये येणं शक्य होत नसल्याचे दिसत आहे.
ही आहे फोर्ब्सद्वारे जारी केलेली सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्सची यादी
2. रायन रेनॉल्ड्स (Ryan Reynolds) – $71.5m (£54.5m)
3. मार्क वाह्ल्बर्ग (Mark Wahlberg) – $58m (£44.2m)
4. बेन एफ्लेक (Ben Affleck) – $55m (£41.9m)
5. विन डीजल (Vin Diesel) – $54m (£41.2m)
6. अक्षय कुमार (Akshay Kumar) – $48.5m (£37m)
7. लिन-मैनुअल (Lin-Manuel Miranda) – $45.5m (£34.7m)
8. विल स्मिथ (Will Smith) – $44.5m (£33.9m)
9. एडम सैंडलर (Adam Sandler) – $31m (£23.8m)
10. जैकी चैन (Jackie Chan) – $30m (£23m)