अक्षय म्हणाला, भन्साळींची गरज मोठी, 'पॅडमॅन' पुढे ढकलला

अक्षय म्हणाला, भन्साळींची गरज मोठी, 'पॅडमॅन' पुढे ढकलला

अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांचे सिनेमे 25 जानेवारीला रिलीज होणार होते. आता अक्षयचा पॅडमॅन पुढे ढकललाय. तो 9 फेब्रुवारीला रिलीज होईल.

  • Share this:

19 जानेवारी : अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांचे सिनेमे 25 जानेवारीला रिलीज होणार होते. आता अक्षयचा पॅडमॅन पुढे ढकललाय. तो 9 फेब्रुवारीला रिलीज होईल. अक्षय आणि संजय लीला भन्साळींनी एकत्र घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे सांगितलं. अक्षय म्हणाला, ' आमच्यापेक्षा भन्साळींची गरज मोठी आहे.'

पद्मावत आणि पॅडमॅन यांची बाॅक्स आॅफिसवरची टक्कर आता होणार नाही. पद्मावतच्या रिलीजला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदिल दाखवला असला, तरीही करणी सेनेचा विरोध कायम आहे. त्यामुळे थिएटरमध्ये तोडफोडीची शक्यता आहे. त्याचा पॅडमॅनवर परिणाम होईल म्हणूनच अक्षय चार पावलं मागे झालाय.

पत्रकार परिषदेत बोलताना अक्षय म्हणाला, ' संजय लीला भन्साळींसोबत मी दोन सिनेमांत काम केलंय. त्यांनी मला विनंती केल्यावर मला ती मान्य करायलाच लागली.

त्यामुळे आता 25 जानेवारीला प्रेक्षकांना कुठला सिनेमा पाहायचा हा विचार करावा लागणार नाही. आता फक्त पद्मावतचाच पर्याय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2018 07:12 PM IST

ताज्या बातम्या