अक्षयच्या 'पॅडमॅन'चं पोस्टर रिलीज

अक्षयच्या 'पॅडमॅन'चं पोस्टर रिलीज

अरुणाचलमच्या मुरुगनाथम या व्यक्तीवर हा सिनेमा आहे. त्याचंच काम अक्षयनं केलंय. मुरुगनाथम स्त्रियांसाठी स्वस्त सॅनिटरी नॅपकिन्स बनवून विकायचे. अनेक आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागलं होतं.

  • Share this:

30 आॅक्टोबर : अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'चं पोस्टर रिलीज झालं. त्यानं स्वत: हे पोस्टर ट्विट केलंय. 26 जानेवारी 2018ला हा सिनेमा रिलीज होतोय. ट्विंकल खन्नाच्या पुस्तकावर हा सिनेमा बेतलाय. आर. बल्कीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अक्षयसोबत सोनम कपूर, राधिका आपटेही आहेत. बिग बींचा स्पेशल अॅपियरन्स आहे.

अरुणाचलमच्या मुरुगनाथम या व्यक्तीवर हा सिनेमा आहे.  त्याचंच काम अक्षयनं केलंय. मुरुगनाथम स्त्रियांसाठी स्वस्त सॅनिटरी नॅपकिन्स बनवून विकायचे. अनेक आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागलं होतं.

अक्षय कुमार नेहमीच आॅफबिट सिनेमे करतो. आणि ते लोकप्रियही होतात. अक्षयच्या या सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे.

First published: October 30, 2017, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading