Home /News /entertainment /

Bachchan Pandey: 'बच्चन पांडे' ची रिलीज डेट OUT, नवं पोस्टर पाहून वाढली उत्सुकता

Bachchan Pandey: 'बच्चन पांडे' ची रिलीज डेट OUT, नवं पोस्टर पाहून वाढली उत्सुकता

अभिनेता अक्षय कुमारने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बच्चन पांडे'चं नवं पोस्टर शेअर करत चित्रपट रिलीजची डेट सांगितली आहे.

  मुंबई,18 जानेवारी- बॉलिवूड   (Bollywood)   खिलाडी अक्षय कुमार    (Akshay Kumar)  सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटात व्यग्र असतो. तो सतत आपल्या हटके चित्रपटांसोबत चाहत्यांच्या भेटीला येत असतो. 'अतरंगी रे' नंतर आता अक्षय कुमार 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey)   मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. नुकताच या चित्रपटाची रिलीज डेट   (Release Date)  जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता अक्षय कुमारने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बच्चन पांडे'चं नवं पोस्टर शेअर करत चित्रपट रिलीजची डेट सांगितली आहे. अक्षय कुमारचा बहुचर्चित 'बच्चन पांडे' येत्या 18 मार्चला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. याआधीच अक्षय कुमारचा चित्रपटातील लुक समोर आला होता. तेव्हापासूनच त्याचे चाहते या चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. हा चित्रपट एक कॉमेडी, ऍक्शन चित्रपट असणार आहे. या चित्रपटात दमदार स्टारकास्ट आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री क्रिती सेनन, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी,प्रतीक बब्बर, पंकज त्रिपाठी असे अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  'बच्चन पांडे' चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केलं आहे. यापूर्वी त्यांनी सिंघम,सिम्बासारख्या अनेक चित्रपटांचं उत्कृष्ट लेखन केलं आहे. तसेच त्यांनी एन्टरटेनमेन्ट, हाऊसफुल 3 सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केलेल्या साजिद यांच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांची अशीच अपेक्षा आहे. (हे वाचा:ही' टीव्ही अभिनेत्री आहे विकी कौशलची खास मैत्रीण! पाहा थ्रोबॅक VIDEO) अक्षय कुमार नुकताच 'अतरंगी रे' या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान आणि साऊथ सुपरस्टार धनुषसुद्धा होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला होता. त्यांनतर अक्षय कुमारने नुकताच आपल्या आगामी 'सेल्फी' या चित्रपटाचीसुद्धा घोषणा केली आहे. अक्षय कुमार आगामी काळात 'सेल्फी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत त्याची जोडी जमली आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहेत त्यामुळे चाहते फारच आनंदी आहेत. चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरु होणार असल्याचं अक्षय कुमारनं सांगितलं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Akshay Kumar, Bollywood, Entertainment

  पुढील बातम्या