नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : बॉलिवूडचे ‘खिलाड़ी’ अक्षय कुमार (Akshay Kumar) याची आई अरुणा भाटिया गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयातील आयसीयूमध्ये ( ICU at Hiranandani Hospital, Mumbai) दाखल करण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, अक्षय कुमार आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी सोमवारी सकाळी ब्रिटेनहून शूटिंग सोडून मुंबईत परतला आहे. अक्षय सध्या सिंड्रेला चित्रपटाचं युकेमध्ये शूटिंग करीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारला आपल्या आईविषयी कळाल्यानंतर तो ब्रिटेनहून मुंबईला आईला पाहण्यासाठी निघाला. मात्र चित्रपटाचं शूटिंग सुरू राहणार आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहे.
हे ही वाचा-सिद्धार्थच्या जाण्याने भावुक झाला करण जोहर; पाहा अभिनेत्याविषयी काय म्हणाला
सध्या त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अक्षय कुमार याचं त्याच्या आईवर खूप जीव आहे. त्यामुळे आईच्या प्रकृती बद्दल कळताच तो मुंबईला परतला.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.