अक्षयच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, लक्ष्मी बॉम्ब रिलीजची तारीख ठरली; कुठे बघता येईल?

अक्षयच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, लक्ष्मी बॉम्ब रिलीजची तारीख ठरली; कुठे बघता येईल?

सुपरस्टार अक्षय कुमारचा (Akshay Kumar) लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 9 नोव्हेंबरला OTT प्लॅटफॉर्मवर लक्ष्मी बॉम्ब (Laxmmi Bomb) रिलीज होईल

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर : अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे कारण अक्कीचा मोस्ट अवेटेड सिनेमा लक्ष्मी बॉम्ब (Laxmmi Bomb) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 9 नोव्हेंबरला हा सिनेमा भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये प्रदर्शित होतोय.  OTT प्लॅटफॉर्म हॉट स्टारवर (Hot Star) हा सिनेमा रिलीज होणार आहे. अक्षय कुमार (Akshay kumar new movie) या चित्रपटात ट्रान्स जेंडरची भूमिका साकारत आहे.

‘कंचना 2’ या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे.  अक्षयच्या या भूमिकेचं नाव लक्ष्मी असं आहे.

कोरोना, आर्थिक मंदी आणि अनेक महिने सिनेमागृह बंद असल्यामुळे लक्ष्मी बॉम्ब या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली जात होती. पण आता 9 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार ह्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. कॉमेडी हॉरर असा या चित्रपटाचा जॉनर आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलिज झालं  तेव्हापासूनच अक्षयच्या लूकची जोरदार चर्चा सुरु झाली होती. राघवा लॉबॉरेन्स या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मी बॉम्ब या सिनेमाचं मोशन पोस्टर झळकलं होतं. आणि हे मोशन पोस्टर आत्तापर्यंत सर्वात जास्त पाहिलं गेलेलं मोशन पोस्टर ठरलं होतं. हॉटस्टाने स्वत: याबाबत माहिती दिली होती.

अक्षय कुमारसोबतच (Akshay Kumar) कियारा अडवाणी (Kiara Advani), तुषार कपूर (Tushar Kapoor), शरद केळकर (Sharad Kelkar) असे दिग्गज कलाकार या सिनेमामध्ये झळकणार आहेत. आता ही दिवाळी अक्षयसाठी दणक्यात जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या सिनेमात काम करण्यासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. लक्ष्मी बॉम्बनंतर रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या सिनेमामध्ये अक्षय कुमार झळकणार आहे. त्यासोबतच पुढील वर्षात हेराफेरी 3, अतरंगी रे, बच्चन पांडे, बेल बॉटम ह्या चित्रपटात पुढील वर्षाहत अक्षय दिसणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: September 30, 2020, 6:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading