मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Akshay Kumar ने बायको ट्विंकल खन्नासाठी लिहिली खास पोस्ट; रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Akshay Kumar ने बायको ट्विंकल खन्नासाठी लिहिली खास पोस्ट; रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता अक्षय कुमार   (Akshay Kuamr)  नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतो. परंतु मिळेल त्या वेळी तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असतो. सध्या अभिनेता आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेला आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kuamr) नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतो. परंतु मिळेल त्या वेळी तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असतो. सध्या अभिनेता आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेला आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kuamr) नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतो. परंतु मिळेल त्या वेळी तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असतो. सध्या अभिनेता आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 29 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता अक्षय कुमार   (Akshay Kuamr)  नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतो. परंतु मिळेल त्या वेळी तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असतो. सध्या अभिनेता आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेला आहे. नुकताच अक्षयने पत्नी ट्विंकल खन्नासाठी  (Twinkle Khanna Birthday)  खास पोस्ट लिहीत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चित कपल्स पैकी एक आहेत. या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना फारच आवडते. आज ट्विंकल खन्ना आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. याचंच औचित्य साधत अक्षयने खास आपल्या पत्नीसाठी रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काहीवेळीपूर्वी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या पत्नीसोबतचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघेही व्हेकेशन मूडमुध्ये दिसून येत आहेत. हे दोघे सध्या मालदीवमध्ये आहेत. हा फोटोही त्याठिकाणीच घेतला असल्याचं दिसत आहे. अभिनेत्याने आपल्या पत्नीच्या वाढदिवसासाठी ही खास पोस्ट केली आहे. फोटो शेअर करत अक्षय कुमारने लिहिलं आहे, 'जेव्हा तू माझ्या सोबत असतेस. तेव्हा आयुष्यातील प्रत्येक कठीण वाटचाल सोपी होऊन जाते. वाढदिवसाच्या शुभेच्छा टीना'. असं म्हणत अक्षयने आपल्या आयुष्यातील आपल्या पत्नीचं महत्व अधोरेखित केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमार सध्या आपल्या पत्नीसोबत मालदीवमध्ये आहे. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठीच तो याठिकाणी गेल्याचं म्हटलं जात आहे. नुकतंच अक्षयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीवचे आपले काही व्हिडीओही शेअर केले होते. यामध्ये अक्षय मालदीवच्या निसर्गरम्य वातावरणात सायकलिंगचा आनंद घेताना दिसून आला होता. त्याचे हे व्हिडीओ चाहत्यांना फारच पसंत पडले होते. तसेच हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अक्षय कुमार बऱ्याच दिवसांनंतर व्हेकेशन घेताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयच्या आईचं निधन झालं होतं. परंतु त्याच्या अवघ्या दोन दिवसांतच अक्षय आपल्या कामावर परतला होता. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या धाडसाचं कौतुक केलं होतं. तर नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोलदेखील केलं होतं.

(हे वाचा:Nora Fatehi ला हवाय असा Life partner; पाहा तुमच्यात ते गुण आहेत का?)

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी 2001 मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतरही त्यांच्यातील प्रेम वाढतच गेलं. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही ते बॉलिवूडच्या रोमँटिक कपल्समध्ये गणले जातात. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत. ट्विंकल खन्ना सतत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या मुलांसोबतचे आपले फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच ट्विंकलने आपल्या मुलीसोबत एक मजेशीर व्हिडीओ बनवला होता. त्याला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळाली होती. ट्विंकल खन्ना ही ज्येष्ठ दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची मोठी लेक आहे. ट्विंकल आपली आई डिम्पलच्या फारच जवळ आहे. या दोघींमध्ये फारच छान बॉन्डिंग आहे.

(हे वाचा:आमिरची मुलगी ईराने BFला KISS करतानाचा फोटो केला शेअर, युझर्स म्हणाले...)

अक्षयच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अक्षय कुमारचा 'अतरंगी रे' चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली पसंती मिळत आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत सारा अली खान आणि साऊथ सुपरस्टार धनुषसुद्धा आहे.

First published:

Tags: Akshay Kumar