अक्षय कुमार नव्या वर्षात 4 अभिनेत्रींसोबत करणार काम, एक त्याच्याहून 30 वर्षांनी लहान

अक्षय कुमार नव्या वर्षात 4 अभिनेत्रींसोबत करणार काम, एक त्याच्याहून 30 वर्षांनी लहान

नव्या वर्षात अक्षय कुमारचे चार चित्रपट येणार असून या चारही चित्रपटात त्याच्यासोबत वेगवेगळ्या अभिनेत्री असणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी :  2019 हे वर्ष अक्षय कुमारसाठी धमाकेदार होते. त्याचे चार सिनेमे रिलीज झाले आणि चारही बॉक्स ऑफिसवर गाजले. त्यातील दोन सिनेमांनी तर दोनशे कोटीपेक्षा जास्त कमाई केली.  वर्षाच्या शेवटी 27 डिसेंबरला गुड न्यूज हा चित्रपट रिलीज झाला होता. त्या सिनेमाने  बॉक्स ऑफिसवर 191 कोटीची कमाई केली.

2020 मध्ये रिलीज होणाऱ्या सिनेमाच्या तयारीत अक्षय कुमार व्यग्र  आहे. यावर्षी देखील अक्षयचे चार सिनेमे रिलीज होणार आहे. यामध्ये तो वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम करणार आहे.

सूर्यवंशी

सूर्यवंशी सिनेमामध्ये अक्षय कुमार कैटरीना कैफ या अभिनेत्रीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कटरीना आणि अक्षयचा हा आठवा सिनेमा असेल. त्यांनी पूर्वी अनेक सिनेमानमध्ये एकत्र काम केले आहे. अक्षयचा सूर्यवंशी हा सिनेमा मार्च महिन्यात रिलीज होणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी आहेत.

लक्ष्मी बॉम्ब

ईद दिवशी अक्षयचा दुसरा सिनेमा लक्ष्मी बॉम्ब रिलीज होणार आहे. लक्ष्मी बॉम्ब सिनेमाचे दिग्दर्शन राघव लॉरेंस यांनी केले असून ते साउथ सिनेमाचे दिग्दर्शक आहे.  लक्ष्मी बॉम्बमध्ये अक्षय सोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिका दिसणार आहे. याच्या आधी अक्षय आणि कियाराने गुड न्यूज मध्ये एकत्र काम केले आहे. कियारा ही आता 27 वर्षाची आहे.

पृथ्वीराज

दिवाळीच्या मुहूर्ताला अक्षयचा मैग्नम ऑपस सिनेमा पृथ्वीराज रिलीज होणार आहे. डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी हे सिनेमाचे दिग्गदर्शक आहेत. सम्राट पृथ्वीराज चौहान आणि संयोगिता याच्या प्रेमावर  आधारित हा सिनेमा असणार आहे. संयोगिताची भूमिका माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर करणार आहे. मात्र मानुषी ही अक्षयपेक्षा लहान आहे. अक्षय कुमार आता 50 वर्षाचा आहे आणि मानुषी ही 22 वर्षाची आहे. त्यामुळे मानुषी आणि अक्षयच्या वयामध्ये 30 वर्षाचा फरक आहे.

'तानाजी'त अजय देवगणच्या एंट्रीवर थिएटरमध्ये नोटांचा पाऊस, पाहा हा VIDEO

बच्चन पांडेय

2020 च्या शेवटी क्रिसमसला अक्षय कुमारचा बच्चन पांडेय हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहे.  त्यांनी 2019 मध्ये अक्षयसोबत हाऊसफुल 4 ब्लॉकबास्टर सिनेमा केला आहे. बच्चन पांडेयमध्ये अक्षयसोबत कृति सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यांनी अगोदर हाऊसफुल 4 या सिनेमामध्ये एकत्र काम केले आहे.

दबंग खानला वाटतेय या गोष्टीची भीती, स्वतःच केला खुलासा

First published: January 17, 2020, 8:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading