Home /News /entertainment /

सुपरस्टार Akshay Kumar झळकणार 'या' दाक्षिणात्य सुपरहिट सिनेमाच्या रिमेकमध्ये

सुपरस्टार Akshay Kumar झळकणार 'या' दाक्षिणात्य सुपरहिट सिनेमाच्या रिमेकमध्ये

Akshay Kumar

Akshay Kumar

एअर डेक्कनचे मालक कॅप्टन. जीआर.गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित सिनेमा सोरराई पोटरुचा(Soorarai Pottru ) हिंदी रिमेक येत आहे. या दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटात आता बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar ) झळकणार आहे.

    नवी दिल्ली, 29 जानेवारी: एअर डेक्कनचे मालक कॅप्टन. जीआर.गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित सिनेमा सोरराई पोटरुचा (Soorarai Pottru) हिंदी रिमेक येत आहे. या दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटात आता बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) झळकणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तमिळ भाषेतील या सुपरहिट चित्रपटामध्ये साऊथ सुपरस्टार सूर्या शिव कुमार झळकला होता. त्याचीच भूमिका अक्षय बॉलिवूडमध्ये करतोय. मागच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. करोनामुळे थिएटर्स बंद असल्याने निर्मात्यांनी हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित केला होता. ओटीटीवर प्रदर्शित होऊनही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार गेल्या सहा महिन्यांपासून या चित्रपटाबद्दल निर्मात्यांशी चर्चा करत आहे. गेल्या वर्षी त्याने हा चित्रपट करण्यास होकार दिला होता. काही दिवसांपूर्वी, या चित्रपटावर साईनसुद्धा केली आहे. हा चित्रपट दिग्दर्शक सुधा कोंगरा यांनी बनवला होता आणि आता सुधा 2020 मध्ये या चित्रपटाचा रिमेक बनवणार आहे. विकरण मल्होत्रा ​​आणि सुरिया या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. अशी आहे स्टोरी फिल्म 'सोरारई पोटरु' (Soorarai Pottru)ची ऑस्करसाठीसुध्दा निवड झाली होती. बैलगाडीतून प्रवास करणारा एक गावकरी गावासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने कसा झपाटून जातो आणि स्वत:ची एअरलाईन्स स्थापन करतो, त्याच्या यशाची ही गोष्ट आहे. हे कथानक डेक्कन एअरलाईन्सचे संस्थापक कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांच्या आयुष्यावर आधारित ‘सिंपल फ्लाय’ या पुस्तकावर बेतलेले आहे. त्यांच्या संघर्षाची ही कथाच मुळी मनाचा ठाव घेणारी आहे. नेदूमारन राजांगम हे यातील मुख्य पात्र. नेदूमारन सर्व थरातील लोकांना हवाई प्रवास परवडावा म्हणून धडपडत असतो आणि शेवटी यशस्वी होतो. अपर्णा बालमुरलीने यात सूर्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 'बच्चन पांडे', 'पृथ्वीराज', 'राम सेतू', 'OMG 2', 'गोरखा', 'मिशन सिंड्रेला' आणि 'रक्षा बंधन' यासह 8-10 चित्रपट आहेत.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Akshay Kumar, Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, South indian actor

    पुढील बातम्या