मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'बच्चन पांडे'च्या शूटिंगला मुहूर्त मिळाला; 2 हॉट अभिनेत्रींसह अक्षय कुमारची रंगणार केमिस्ट्री

'बच्चन पांडे'च्या शूटिंगला मुहूर्त मिळाला; 2 हॉट अभिनेत्रींसह अक्षय कुमारची रंगणार केमिस्ट्री

अक्षय कुमार (Akshay Kumar) लकरच त्याच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. अक्कीची भूमिका काहीशी हटके असेल.

अक्षय कुमार (Akshay Kumar) लकरच त्याच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. अक्कीची भूमिका काहीशी हटके असेल.

अक्षय कुमार (Akshay Kumar) लकरच त्याच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. अक्कीची भूमिका काहीशी हटके असेल.

मुंबई, 28 डिसेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) आणि त्यामुळे सुरू झालेला लॉकडाऊन (Lockdown) याचा सर्वात जास्त फटका मनोरंजन विश्वाला बसला. अनेक महिने शूटिंग बंद होती. आता सगळी गाडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक सिनेमांची शूटिंग रखडली. त्याचा परिणाम असा झाला की, जे चित्रपट 2020 च्या शेवटी रिलीज होणार होते. त्यांच्या रिलीज डेट पुढे गेल्या असंच काहीसं झालं आहे, अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सिनेमांबद्दल. लक्ष्मी (Laxmii) सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर अक्षय कुमार आता त्याच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

6 जानेवारी 2021 पासून अक्षय बच्चन पांडे (Bachchan Pandey) सिनेमाचं शूट सुरू करेल अशी माहिती मिळाली आहे. फरहाद समजी हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. जैसलमेरमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अभिनेत्री कृती सेनॉनसोबत अक्षय या सिनेमांत दिसेल. अक्की बच्चन पांडेमध्ये एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्याला अभिनेता व्हायचं असतं. सिनेमाच्या नावावरुनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. 30 दिवस राजस्थानमध्ये शूट केल्यानंतर अक्षय कुमार परतणार आहे. सिनेमाच्या मेकर्सनी याबद्दल अजून ठोस माहिती दिलेली नाही.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

नाडियादवाला यांच्या ग्रँडसन एन्टरटेंन्मेंटच्या बॅनरखाली हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बच्चन पांडेमध्ये अक्षय कुमार, कृती सेनॉन यांच्यासोबत जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असेल. आता या सिनेमाचा प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Akshay Kumar, Bollywood