'बाॅस' अक्षय कुमार होणार आता 'या' कॉमेडी शोचा 'सुपर बाॅस'

'बाॅस' अक्षय कुमार होणार आता 'या' कॉमेडी शोचा 'सुपर बाॅस'

आता अक्षयच्या कॉमेडीच्या चाहते असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण अक्षय आता 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॉमेडी शो चा जज असणार आहे.

  • Share this:

27 मे : बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार हा जसा त्याच्या अॅक्शनसाठी ओळखला जातो, तसाच तो त्याच्या कॉमेडी टायमिंगसाठीही तो लोकप्रिय आहे.  आता अक्षयच्या कॉमेडीच्या चाहते असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण अक्षय आता 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॉमेडी शो चा जज असणार आहे.

या शो च्या माध्यमातून अक्षय बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. या वेळी तो  'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या स्टँड अप कॉमेडी शो च्या येणाऱ्या सीझनमध्ये जज म्हणून पहायला मिळेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय या शो चा मुख्य जज असेल. तसंच शोमध्ये त्याला 'सुपर बॉस' ही पदवीही देण्यात येणार आहे. यावेळी त्याच्यासोबत तीन मेंटर्सही असतील.  या शो च्या पहिल्या सीझनमध्ये नवजोतसिंग सिद्धू आणि शेखर सुमन हे जज च्या भूमिकेत पहायला मिळाले होते.

याअगोदरही अक्षयने २००८ आणि २००९ साली 'खतरों के खिलाडी' हा छोट्या पडद्यावरील अॅक्शन रियालिटी शो होस्ट केलेला. याबरोबरच २०१४ साली अक्षय 'डेयर २ डान्स' या शोचा प्रेजेंटर म्हणून आपल्यासमोर आला होता.

First published: May 27, 2017, 7:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading