मुंबई 10 जून: “अक्षय कुमार माझ्यामुळं सुपरस्टार झाला. त्याला कोण विचारत होतं. त्याला लोक गरीबांचा मिथून चक्रवर्ती म्हणायचे” असं वक्तव्य करत अभिजीत भट्टाचार्य यांनी एकच खळबळ उडवली आहे. अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) हे बॉलिवूडमधील एक नामांकित गायक म्हणून ओळखले जातात. खुबसुरत, मै कोई ऐसा गीत गाऊ, सुनो ना सुनो ना, बडी मुश्कील है यांसारखी शेकडो सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहे. (Abhijeet Bhattacharya Best song) जवळपास दोन दशकं आपल्या सुरेल आवाजाच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर राज्य करणारे अभिजित सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांद्वारे ते सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी त्यांनी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारवर निशाणा साधला. जर ते नसते तर अक्षय आज सुपरस्टार नसता असा चकित करणारा दावा त्यांनी केला.
‘टीम इंडिया जिंकल्यास कपडे उतरवणार’; पूनम पांडेची मोठी घोषणा
इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत यांनी आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी अक्षय कुमारचा देखील केला. ते म्हणाले, “माझ्या गाण्यांमुळे अक्षय कुमार लोकप्रिय झाला. जेव्हा तो आला तेव्हा तो लोकप्रिय नव्हता, ज्याप्रमाणे मिथुन चक्रवर्तीला गरीबांचा अमिताभ बच्चन म्हणायचे त्याप्रमाणे अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती म्हणून ओळखायचे. गाण्यांमुळे देव आनंद, राज कपूर आणि राजेश खन्ना स्टार झाले होते. ‘खिलाडी’नंतर अक्षय कुमार स्टार झाला. हे सगळे कलाकार माझ्या गाण्यांमुळे लोकप्रिय झाले आहेत.”
‘मी लो बजेट सेलिब्रिटींचे रिव्हू करत नाही’; KRK नं उडवली विद्या बालनची खिल्ली
यापूर्वी त्यांनी संगीत विश्वातील ऑटोट्यून या प्रकरणावर देखील टीका केली होती. “एक काळ होता जेव्हा लोक एक गाणं गाण्यापूर्वी तासंतास रियाज करायचे. एखाद्या कडव्यातील सूर चुकला की ते पुन्हा एकदा गायचे. पण आज जमाना बदलला आहे. लोक तोंड वर करुन येतात. काही कुत्र्यांसारखं भोंकतात. त्याला ऑटोट्यूनमध्ये एडिट करतात. अन् गाणं म्हणून प्रेक्षकांसमोर सादर करतात. अशा कलाकारांना खरंच गायक म्हणावं का? असा प्रश्न पडतोय.” असा सवाल करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Movie review, Song