BMC ला आता अक्षय कुमारचा आधार, मुंबईच्या समस्यावर निघणार तोडगा?

BMC ला आता अक्षय कुमारचा आधार, मुंबईच्या समस्यावर निघणार तोडगा?

अक्षयनं त्याच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) संदर्भात एक ट्वीट केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 7 जुलै : अभिनेता अक्षय कुमार सध्या त्या आगामी सिनेमा ‘मिशन मंगल’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याशिवाय त्याचा आणखी एक सिनेमा सूर्यवंशीच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. अक्षय अभिनयाच्या व्यतिरिक्त सामाजिक कार्यांतही सहभाग घेत असतो. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो समाजिक जागृती करण्याचा प्रयत्न करत असतो. अक्षय कितीही व्यस्त असला तरीही आजूबाजूच्या सर्व गोष्टींची त्याला माहीती असते. हे त्यानं नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरून दिसून आलं.

अक्षयनं त्याच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) संदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यानं लिहिलं, ‘मुंबई महानगरपालिका आता ट्वीटरवर @mybmc म्हणून उपलब्ध आहे. आता तुम्ही तुमचे सल्ले किंवा तक्रारी थेट पोहोचवू शकता. याचा वापर करा आणि तुमचा आवाज थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवा.’ अक्षयनं केलेल्या ट्वीटनुसार आता नागरिकांना त्यांच्या आजूबाजूंच्या समस्यांविषयी महानगरपालिकेशी सरळ संवाद साधता येणार आहे. विशेषतः पावसाळ्यात येणाऱ्या समस्यांसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरेल.

VIDEO- विराटच्या चौकारावर अनुष्काने विचारले, ‘फोर का सिग्नल क्या होता है...’

मागच्या काही काळापासून BMC वर सतत टीका केली जात आहे. मुंबईतील नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत असल्या तरीही त्यावर योग्य मार्ग निघत नसल्यानं लोकांमध्ये संताप दिसून येत आहे. त्यामुळे आता अक्षयच्या या ट्वीटमुळे BMCला आता अक्षयचा आधार मिळाल्याचं म्हटलं जात आहे. अक्षयच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याचा मिशन मंगल हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच दिवशी जॉन अब्राहमचा बाटला हाऊस आणि प्रभासचा साहो हे दोन सिनेमासुद्धा एकाच दिवशी रिलीज होत आहे त्यामुळे या तिन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगळीच चुरस पाहायला मिळणार आहे.

पती आयुष दूर राहत असल्यानं सलमानच्या बहीणीनं केलं दुसरं लग्न?

फक्त 7 महिन्यात रेमो डिसूजाच्या पत्नीनं असं कमी केलं वजन

=============================================================

EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

First published: July 7, 2019, 3:34 PM IST

ताज्या बातम्या