निकाल अयोध्या प्रकरणाचा पण ट्रोल होतोय अक्षय कुमार, तुम्ही हे PHOTO पाहिलेत का?

निकाल अयोध्या प्रकरणाचा पण ट्रोल होतोय अक्षय कुमार, तुम्ही हे PHOTO पाहिलेत का?

ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाचा निकाल लागला असून यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसताना त्याला ट्रोल केलं जातं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर निकाल दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने या प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला. यामध्ये वादग्रस्त जागेचा निर्णय अत्यंत संवेदनशील असा होता. शिया वक्फ बोर्डाचा आणि निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने या जागेचा मालकी हक्क रामलला न्यासाचा असल्याचा निर्णय दिला.

अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देशातील अनेक राजकीय, धार्मिक आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. यात अभिनय क्षेत्रातील काही कलाकारांनीही ट्विट केलं. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही तरी देखील त्याला ट्रोल केलं जात आहे.

अलिकडच्या काळात राज्यात किंवा देशात एखादी मोठी गोष्ट घडली की त्यावर अक्षय कुमार ट्रोल होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामागे त्याने गेल्या काही वर्षांत केलेले चित्रपट हे मुख्य कारण आहे. याआधी मंगळ मोहिम, एअर स्ट्राइक, काश्मीरमधून कलम 370 हटवणे किंवा आता अयोध्या प्रकरण या घडामोडीनंतर अक्षय कुमार ट्रोल झाला.

अक्षय कुमारने गेल्या काही वर्षांत सत्य कथेवर आधारित चित्रपट केले आहेत. त्यामध्ये देशभक्तीपर आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चित्रपटांचा समावेश आहे. देशासाठी अभिमानाची गोष्ट असेलेल्या घटनांवर त्याचे चित्रपट हिटही झाले.

आता देशात असं काही चांगल किंवा एखादी मोठी घटना घडली तर अक्षय कुमारसाठी पुढच्या चित्रपटाला कथानक सापडलं असं म्हणत त्याला ट्रोल करतात.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

Published by: Suraj Yadav
First published: November 9, 2019, 2:40 PM IST

ताज्या बातम्या