Home /News /entertainment /

VIDEO: अक्षय कुमारनं उडवली कृष्णाची खिल्ली, म्हणाला सगळं नकली परंतु मामासोबत....

VIDEO: अक्षय कुमारनं उडवली कृष्णाची खिल्ली, म्हणाला सगळं नकली परंतु मामासोबत....

‘अतरंगी रे (Atrangi Re) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री सारा अली खान आणि दिग्दर्शक आनंद एल. राय (Aanand L Rai) द कपिल शर्मा शोमध्ये उपस्थित राहणार आहेत.

     मुंबई,18 डिसेंबर-   टीव्हीवरील द कपिल शर्मा शो   (The Kapil Sharma Show)   गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांना हसवण्याचं काम करत आहे. कपिलच्या शोमध्ये अनेक सेलिब्रेटी सहभागी होतात. यामध्ये बॉलिवूड कलाकारांची संख्या जास्त असते. अनेकजण कपिलच्या शोमध्ये येऊन आपल्या चित्रपटांचं प्रमोशन करतात. आगामी एपिसोडमध्ये अक्षय कुमार  (Akshay Kumar)  आपल्या 'अतरंगी रे'  (Atrangi Re)  या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. अक्षयसोबत सारा अली खान (Sara Ali Khan) आणि चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल. राय (Aanand L Rai) हे देखील उपस्थित राहणार आहेत. या एपिसोडचा एक प्रोमो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये अक्षय कुमार शोमधील 'सपना' म्हणजेच अभिनेता कृष्णा अभिषेकची   (Krushna Abhishek)  खिल्ली उडवताना दिसत आहे. या वीकेंडला (18 व 19 डिसेंबर 21) ‘अतरंगी रे (Atrangi Re) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री सारा अली खान आणि दिग्दर्शक आनंद एल. राय (Aanand L Rai) द कपिल शर्मा शोमध्ये उपस्थित राहणार आहेत. या एपिसोडमध्ये अक्षय चाहत्यांना आपलं हात चलाखीचं कसब दाखवणार आहे. चॅनलनं या एपिसोडचा एक प्रोमो शेअर केला आहे. तो पाहून अक्षयच्या उपस्थितीतील एपिसोडमध्ये हास्यकल्लोळ उडणार आहे, हे दिसतं. अक्षय कुमारने उडवली ‘सपना’ची खिल्ली- अक्षय कुमार यापूर्वीही अनेकदा कपिलच्या शोमध्ये आलेला आहे. जेव्हा तो शोमध्ये येतो तेव्हा तो कपिलसह इतर कलाकारांची मनसोक्त खिल्ली उडवतो. या वेळच्या एपिसोडमध्येही अक्षय असंच काहीसं करताना दिसणार आहे. शोमध्ये, कृष्णा अभिषेक 'सपना' नावाच्या ब्युटिशियनची भूमिका साकारत आहे. याशिवाय तो अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती यांची मिमिक्रीही करतो. आगामी एपिसोडमध्ये अक्षय कुमार कृष्णासोबत मस्ती करताना दिसणार आहे.
    सगळं काही खोट पण- 'कधी नकली अमिताभ होतो तर कधी नकली जॅकी, सगळचं खोटं आहे...पण, मामासोबतचा वाद मात्र एकदम खरा आहे', असा टोमणा अक्षय कृष्णाला मारताना प्रोमोमध्ये दिसत आहे. अक्षयचा टोमणा ऐकून सुरुवातीला कृष्णा गोंधळून जातो नंतर मात्र, जोर-जोरात हसू लागतो. 2016 पासून सुरू आहे कृष्णा आणि मामा गोविंदाचा वाद- 2016 पासून कृष्णाचे आपला मामा अभिनेता गोविंदासोबत मतभेद आहेत. दोन्ही कुटुंबं एकमेकांपासून दूर राहणंच पसंत करतात. यावर्षी 'द कपिल शर्मा शो'मध्ये गोविंदा आपली पत्नी सुनीतासोबत आला होता. त्या एपिसोडमध्ये कृष्णानं अभिनय करण्यास नकार दिला होता. नेमकी हीच गोष्ट लक्षात ठेवून अक्षयनं कृष्णाची खिल्ली उडवली आहे. मात्र, कृष्णानं अक्षयच्या टोमण्याला सिरियसली न घेता हसण्यावारी घेतलं आहे.
    First published:

    Tags: Akshay Kumar, Entertainment, The kapil sharma show

    पुढील बातम्या