गणपतीबाप्पा घेऊन येतायत '2.0'चा टीझर!

गणपतीबाप्पा घेऊन येतायत '2.0'चा टीझर!

अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या बहुचर्चित 2.0 सिनेमाचा टीझर 15 आॅगस्टला रिलीज होणार होता. पण केरळला आलेल्या पुरामुळे तो पुढे ढकलला.

  • Share this:

मुंबई, 28 आॅगस्ट : अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या बहुचर्चित 2.0 सिनेमाचा टीझर 15 आॅगस्टला रिलीज होणार होता. पण केरळला आलेल्या पुरामुळे तो पुढे ढकलला. आता हा टीझर 13 सप्टेंबरला रिलीज होतोय. म्हणजेच गणेश चतुर्थी दिवशी. या सिनेमातून पहिल्यांदाच अक्षय आणि रजनीकांत एकत्र येणार आहेत. हा एक सायफाय सिनेमा आहे. सिनेमात भरपूर स्पेशल इफेक्ट्स वापरलेत.

बाॅलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित रोबोट 2.0 सिनेमाचं मेकिंगचा व्हिडिओ  प्रसिद्ध करण्यात आला होता. या मेकिंग व्हिडिओमध्ये अक्षय आणि रजनीकांत यांचा मेकअप कसा करण्यात आला हे दाखवण्यात आलंय. तसंच स्पेशल इफेक्ट्स  स्टंट्स कसे शूट करण्यात आले हेही तुम्हाला या व्हिडिओत पाहण्यास मिळालं.

एवढंच नाहीतर या सिनेमाचे स्पेशल इफेक्टही धडाकेबाज आहे. या सिनेमाचं जगभरात प्रमोशन सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या '2.0' सिनेमातल्या एमी जॅक्सनचा लूक रिलीज झाला होता. . या पोस्टरमध्ये एमी रोबोटच्या लूकमध्ये दिसते. हा सिनेमा रजनीकांच्या 'रोबोट'चा रिमेक आहे.

एमीनं आपला लूक ट्विटरवर शेअर करत लिहिलं होतं, मी या सिनेमाचं शूट सुरू केलं, तेव्हापासून हा लूक शेअर करायची वाट पाहत होते. या सिनेमात अक्षय खलनायकाच्या भूमिकेत आहे.

अक्षय कुमारला आपण अनेक रूपात पाहिले. रुस्तम, एअरलिफ्ट, पॅडमॅन, टाॅयलेट एक प्रेमकथा असे अनेक सिनेमे हटके होते आणि ते हिटही झाले. अलिकडे रिलीज झालेला गोल्ड सिनेमाही 100 कोटींच्या घरात गेलाय. त्यामुळे दोन सुपरस्टार्स असलेल्या या '2.0' सिनेमाबद्दल उत्सुकता आहे.

VIDEO : दुसरं लग्न करणाऱ्या पतीला पत्नीने आणि मुलांनी भररस्त्यावर धुतलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 06:17 PM IST

ताज्या बातम्या