मुंबई 14 मार्च: बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव सूर्यवंशी (Sooryavanshi) असं आहे. धमाकेदार अॅक्शन सीन्सनं भरलेला हा चित्रपट खरं तर गेल्याच वर्षीपासून चर्चेत आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं चित्रपट वारंवार लांबणीवर जात होता. मात्र प्रेक्षकांची उत्सुकता अधिक न ताणता निर्मात्यांनी अखेर चित्रपटाची खरीखुरी रिलिज डेट जाहिर केली आहे.
अक्षयनं चित्रपटाचा नवा टिझर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. “प्रेक्षकांना सिनेमागृहात घेऊन जाणार असं असं वचन आम्ही दिलं होतं. आता वेळ आली आहे ते वचन पूर्ण करण्याची. आ रही है पुलिस! सूर्यवंशी हा चित्रपट येत्या 30 एप्रिल 2021 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे” अशा आशयाचं ट्विट करुन त्यानं प्रदर्शनाची तारीख जाहिर केली.
अवश्य पाहा - आमिर खान आठ दिवस करायचा नाही अंघोळ; या आहेत अभिनेत्याला वाईट सवयी
We promised you all a cinematic experience and that’s what you will get...the wait is finally over! Aa Rahi Hai Police #Sooryavanshi releasing worldwide in cinemas on 30th April 2021. #Sooryavanshi30thApril pic.twitter.com/IZbczUqmqu
— Akshay Kumar (@akshaykumar) March 14, 2021
‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी यानं केलं आहे. हा चित्रपट 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्ब ब्लास्टवर आधारित आहे. तसेच या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेता अजय देवगण, रणवीर सिंग, कतरिना कैफ देखील झळकणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood, Entertainment, Movie release