मुंबई, 3 ऑगस्ट : रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan First Look) दिवशीच अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) एक good news दिली आहे. त्याच्या पुढच्या नव्या चित्रपटाची घोषणा त्याने याच मुहूर्तावर केली आहे आणि चित्रपटाचं नावही Raksha Bandhan असंच आहे. रक्षाबंधनचा फर्स्ट लुक अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा चित्रपटा पुढच्या वर्षी 5 नोव्हेंबरला रीलिज होईल, असंही यात म्हटलं आहे.
भाऊ-बहिणींच्या प्रेमाची ही गोष्ट असेल, असं पोस्टरवरून स्पष्ट होतं. बहने देती है 100% रिटर्न्स अशी टॅगलाईन या फर्स्ट लुकवर आहे. या पोस्टमध्ये अक्षय कुमार चार बहिणींना बिलगलेला दिसतो. दिग्दर्शकआनंद राय (Anand L Rai) यांच्याबरोबर अक्षयची बहीण अलका स्वतः या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
अक्षयने शेअर केलेल्या पोस्टमध्ये याविषयी सविस्तर लिहिलं आहे. "माझ्या बहिणीबरोबर अलकाबरोबर असलेल्या स्पेशल नात्याची ही भेट सादर करायला मला खूप आनंद होतोय. आनंद राय यांना यासाठी खूप धन्यवाद", असं अक्षय कुमारने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
अक्षय कुमारने त्याच्या या पोस्टमध्ये म्हटलंय की, "माझ्या अख्ख्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मी एतक्या झटक्यात एखादी फिल्म साइन केली असेल. इतकी भावुक करणारी सिनेमाची गोष्ट मी पहिल्यांदाच ऐकली."
हिमांशु रायने लिहिलेली ही कथा मोठ्या पडद्यावर 5 नोव्हेंबर 2021 ला येणार आहे.