...आणि अचानक अक्षय कुमारच्या मुलाच्या मागे लागले भिकारी

फोटोमध्ये तर स्पष्ट दिसतं की या दरम्यान इब्राहिमवर छोटासा हल्लाही झाला. पण या सगळ्या गोतावळ्याला पाहून इब्राहिम अजिबात घाबरला नाही

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 03:33 PM IST

...आणि अचानक अक्षय कुमारच्या मुलाच्या मागे लागले भिकारी

मुंबई. 26 ऑगस्ट- स्टार किड्स कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यातही सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान पतौडी आणि अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटिया यांच्यावर अनेकांची नजर असते. ते कुठे जातात काय करतात हे जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांमध्ये असते. सतत चर्चेत राहणारे इब्राहिम आणि आरव यावेळी त्यांच्या स्टाइल आणि फॅशनसाठी किंवा कोणत्याही नवीन प्रोजेक्टमुळे नाही तर भिकाऱ्यांमुळे चर्चेत आले आहेत.

त्याचं झालं असं की, आरव आणि इब्राहिम दोघंही डिनरला गेले होते. दोघं डिनर संपवून रेस्तराँच्या बाहेर आले तेव्हा त्या दोघांचे फोटो घेण्यासाठी काही छायाचित्रकार तर होतेच शिवाय काही भिकारीही होते. त्यांनी दोघांना घेराव घातला आणि त्यांच्याकडे पैसे मागू लागले. यातून बाहेर कसं पडावं हे त्यांना कळत नव्हतं.

फोटोमध्ये तर स्पष्ट दिसतं की या दरम्यान इब्राहिमवर छोटासा हल्लाही झाला. पण या सगळ्या गोतावळ्याला पाहून इब्राहिम अजिबात घाबरला नाही, उलट सगळ्यांकडे पाहून हसत हसत त्याने तिकडून वाट काढली. मात्र आरव यात पुरता अडकला.

कसाबसा आरव गाडीत जाऊन बसला तर भिकारी त्याच्या गाडीच्या खिडकीकडे येऊन उभे राहिले. या सगळ्यात काय करायला हवं हेच आरवला कळत नव्हतं. आरव आणि इब्राहिमचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडच्या एक पाऊल पुढेच अल्लू अर्जुन, त्याच्या रेंज रोवरची किंमत एकदा वाचाच!

Loading...

सोनम कपूरला व्हिगन होणं नडलं, इन्स्टाग्रामवर स्वतःहून दिली माहिती

जेव्हा चाहतीच्या स्टाइल स्टेटमेन्टसमोर फिकं पडतं दीपिकाचं सौंदर्य

VIDEO: हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले; तापी नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 02:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...