मुंबई 22 मार्च : 21 मार्च 2019 ला बॉलिवूड खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) केसरी (Kesari) सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला होता. या सिनेमाच्या प्रदर्शनाला आता दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. याच निमित्तानं अक्षयनं सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच अक्षयनं केसरी सिनेमा साईन करण्यामागचं कारणही सांगितलं आहे. या सिनेमातील डायलॉग आणि गाण्यानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. मात्र, केवळ प्रेक्षकचं नाही तर अक्षयदेखील सिनेमातील डायलॉगवर भाळला होता.
अक्षय कुमारचं ट्विट -
अक्षय कुमारनं सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये चित्रपटाची काही झलक पाहायला मिळत आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये अक्षयनं लिहिलं, '10000 आक्रमणकारियों के खिलाफ 21 सिख! हा सिनेमा साईन करण्यासाठी एवढी एक लाईन मला पुरेशी होती. माझ्यासाठी ही मोठी सन्मानाची गोष्ट होती.
अक्षय कुमारचा केसरी हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित होता. चित्रपटात एकवीस शिखांच्या धाडसाची कथा दाखवण्यात आली होती. हे एकवीस शिख 10 अफगाणी सैनिकांसोबत लढतात. चित्रपटात अक्षय कुमारनं ईशर सिंग हे पात्र साकारलं आहे. तर, या सिनेमात परिणीती चोप्रानं अक्षयच्या पत्नीची भूमिका साकरली आहे.
10,000 invaders vs 21 Sikhs! This one line was enough for me to do the film, and what an absolute honour it was. Celebrating #2YearsOfKesari@ParineetiChopra @SinghAnurag79 @karanjohar @apoorvamehta18 @SunirKheterpal @DharmaMovies #CapeOfGoodFilms @iAmAzure @ZeeStudios_ pic.twitter.com/PWiTENdPVL
— Akshay Kumar (@akshaykumar) March 21, 2021
खिलाडी कुमार सध्या बॉलिवूडमध्ये अनेक हीट सिनेमे देत आहे. लवकरच अक्षय अनेक नव्या चित्रपटांमधून (Upcoming Movies of Akshay Kumar) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वात आधी अभिनेता रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षीत सूर्यवंशी या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात अक्षयसोबतच कॅटरिना कैफही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, रणवीर आणि अजय या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय अक्षय 'अतरंगी रे', 'बेल बॉटम', 'पृथ्वीराज', 'रक्षाबंधन', 'बच्चन पांडे' आणि 'राम सेतु' या सिनेमांमध्येही झळकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood, Bollywood News, Movie release, Upcoming movie