OMG ! खिलाडी अक्षय कुमारला वाटते 'या' गोष्टीची खूप भीती

OMG ! खिलाडी अक्षय कुमारला वाटते 'या' गोष्टीची खूप भीती

बॉलिवूड सिनेमांमध्ये अनेकदा धोकादायक स्टंट करताना दिसणाऱ्या अक्षयलाही भीती वाटते.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : बॉलिवूडमध्ये सध्या खिलाडी अक्षय कुमारच्या नावाची जोरदार चर्चा आहे. येत्या 21 मार्चला अक्षयचा 'केसरी' सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. त्यामुळे सध्या अक्षय केसरी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  नुकतंच त्यानं सिनेमाच्या प्रमोशनासाठी 'कपिल शर्मा शो'मध्येही हजेरी लावली होती. पण यावेळी अक्षयनं एक असा खुलासा केला ज्यामुळे त्याचे चाहतेही अवाक झाले आहेत. बॉलिवूड सिनेमांमध्ये अनेकदा धोकादायक स्टंट करताना दिसणाऱ्या अक्षयलाही भीती वाटते. पण त्याच्या भीतीमागील कारण समजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

बॉलिवूड सिनेमांमध्ये अक्षय कुमार उंच इमारतीवरून उडी मारताना दिसतो. गुंडांची धुलाई करताना दिसतो. त्यामुळे कोणालाच खरं वाटत नाही की खिलाडी अक्षय कुमारलाही कोणत्या तरी गोष्टीची खूप भीती वाटत असेल. कपिल शर्मा शोमध्ये अक्षय कुमारनं परिणिती चोप्रासोबत हजेरी लावली होती. यावेळी अक्षयला सर्वात जास्त कोणत्या गोष्टाची भीती वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, 'मला माझी पत्नी ट्विंकल खन्ना आणि गोल फिरणाऱ्या झोपाळ्याची खूप जास्त भीती वाटते', असं उत्तर अक्षयनं दिलं. तो म्हणाला, जेव्हा मी झोपाळ्यावरुन खाली उतरतो तेव्हा माझ्या मनात एक विचित्र भावना येते. जी मला अजिबात आवडत नाही.

यावेळी अक्षयनं अभिनेत्री परिणितीला कोणत्या गोष्टीची भीती वाटते याचाही खुलासा केला. अक्षय म्हणाला, परिणीतीला सापांची भीती वाटते. तिच्या समोर साप किंवा कोणत्याही प्राण्याबद्दल बोलायला सुरुवात केली तर ती घाबरुन बेशुद्ध होते. हे ऐकल्यावर मात्र उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी परिणितीनं बहीण प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनासबाबतही अनेक खुलासे केले.

कपिलनं घेतली परिणितीची फिरकी

कपिलनंही परिणितीची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही. त्यानं निकला गंमतीनं परिणितीचा 'इंपोर्टेड जीजू' असं नाव दिलं. अक्षय कुमार आणि परिणिती चोप्राचा 'केसरी' हा सिनेमा 21 मार्चला प्रदर्शित होत आहे. अनुराग सिंहने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 1897 मधील सारागढ़ीच्या लढाईवर आधारित आहे. ज्यात ब्रिटीश भारतीय सेनेच्या 21 शीख जवानांनी 10 हजार अफगाणी सैन्यावर मात केली होती.

First published: March 18, 2019, 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading