असिनच्या घरी आली नन्ही परी,अक्षयकुमारने शेअर केला फोटो !

असिनच्या घरी आली नन्ही परी,अक्षयकुमारने शेअर केला फोटो !

  • Share this:

25 आॅक्टोबर : बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं त्याचा सगळ्यात जवळचा मित्र राहुल शर्मा आणि असिन यांच्या बाळासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.  असिनने एका चिमुकलीली जन्म दिला आहे. राहुल शर्मा आणि असिनच्या बाळासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत अक्षय म्हणाला की, 'हा आनंद कोणत्याही गोष्टीला न जुळणारा आहे. माझा मित्र राहुल आणि असिनला त्यांच्या बाळाबद्दल अभिनंदन.'

असिनने देखील तिची ही खुशखबर तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यावर ती म्हणाली की, 'आज माझ्या मुलीच्या आगमनाची बातमी सांगताना मला खूप आनंद होत आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. हे माझं सगळ्यात मोठ बर्थडे गिफ्ट आहे'.

गंमत म्हणजे असिनने 24 ऑक्टोबरला तिच्या चिमुकलीला जन्म दिला आणि 26 ऑक्टोबरला असिनचा वाढदिवस असतो. असिन आणि राहुलचं लग्न 2016मध्ये झालं. पण त्यानंतर ती कोणत्याही सिनेमात दिसली नाही.

खरंतर असिने तिच्या प्रेगनेंसीची बातमी गुप्त ठेवली होती. इतर अभिनेत्र्यांसारखी तिने बाळाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली नाही. पण अस असलं तरी तिचे चाहते या बातमीने नक्कीचं खुश होणार.

असिनने आमिर खानच्या 'गजनी'या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याआधी ती साऊथ इंडियन सिनेमात काम करायची. 2015मधला कॉमेडी सिनेमा 'ऑल इज वेल'मध्ये ती अभिषेक बच्चन सोबत मुख्य भूमिकेत होती बॉलिवूडमधला हा तीचा शेवटचा सिनेमा होता.

राहुल हा अक्षयच्या मायक्रोमॅक्स मोबाईल कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यानेच असिन आणि राहुलची पहिली भेट घालून दिली होती असं तो एका मुलाखतीत बोलत होता. पण त्यांच्या याच लव्हस्टोरीने त्यांच्या घरी आता एका नव्या चिमुकलीचं आगमन झालं आहे.

First published: October 25, 2017, 9:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading