मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Atrangi Re: अक्षय कुमारनं शेअर केले 'अतरंगी रे'चे मोशन पोस्टर्स; सारा आणि धनुषच्या रोलचा केला खुलासा

Atrangi Re: अक्षय कुमारनं शेअर केले 'अतरंगी रे'चे मोशन पोस्टर्स; सारा आणि धनुषच्या रोलचा केला खुलासा

  'सूर्यवंशी'   (Sooryavanshi)  च्या प्रचंड यशानंतर अक्षय कुमारने   (Akshay Kumar)   त्याच्या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. काही वेळापूर्वी, त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'अतरंगी रे'   (Atarangi Re)  या आगामी चित्रपटाचे तीन मोशन पोस्टर   (Share Motion Poster)  शेअर केले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 23 नोव्हेंबर-  'सूर्यवंशी'   (Sooryavanshi)  च्या प्रचंड यशानंतर अक्षय कुमारने   (Akshay Kumar)   त्याच्या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. काही वेळापूर्वी, त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'अतरंगी रे'   (Atarangi Re)  या आगामी चित्रपटाचे तीन मोशन पोस्टर   (Share Motion Poster)  शेअर केले आहेत. त्यापैकी एक त्याचे स्वतः चे मोशन पोस्टर आहे, दुसरे धनुषचे   (Dhanush)  आणि तिसरे सारा अली खानचे   (Sara Ali Khan)  आहे. तिघांच्याही मोशन पोस्टरमध्ये तिघांचेही वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहेत. या मोशन पोस्टर्ससह त्यांनी सांगितले की, चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारने सारा अली खानचा पहिला मोशन पोस्टर शेअर केला आहे. त्याच्या पार्श्वभूमीत एक संगीत देखील वाजत आहे. यामध्ये साराचे तीन वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहेत. हे शेअर करत अक्षयने लिहिले, "एक मुलगी.. प्रेमात वेडी, अतरंगी नंबर वन रिंकूला उद्या भेटा. अतरंगी रेचा ट्रेलर उद्या डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारने धनुषचे दुसरे मोशन पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये धनुषचे तीन वेगवेगळे लूक दिसत आहेत. हे शेअर करत त्यानं लिहिलं आहे, "या प्रेमकथेच्या अतरंगी नंबर 2 ला भेटा, ज्याचे नाव विशू आहे." त्याचवेळी अक्षयने त्याचा तिसरा मोशन पोस्टर शेअर केला आहे. यामध्ये अक्षयही तीन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. हे शेअर करत त्यानं लिहिलं, “प्रेमाच्या वेडेपणाबद्दल एक विचित्र कथा. या कथेत जादू जोडणारा, तुमचा विश्वासार्ह"

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारने या मोशन पोस्टर्सद्वारे चित्रपटातील धनुष आणि सारा अली खानच्या पात्रांचा खुलासा केला आहे. परंतु, त्याने त्याच्या पात्राचे नाव उघड केले नाही. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.अक्षय कुमारने या चित्रपटाबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटाची कथा अतिशय प्रेक्षणीय आहे, अशी स्क्रिप्ट त्याने यापूर्वी कधीही ऐकली नव्हती. त्याच्या मुलाखतीत अक्षयने ठामपणे सांगितले की, 'माझ्यासाठी आणि आनंद रायसाठी चित्रपट योग्य व्यासपीठावर प्रदर्शित होणे सर्वात महत्त्वाचे आहे'.

अक्षयचा असा विश्वास आहे की जर आशयात ताकद असेल तर ती कुठेही, कोणत्याही व्यासपीठावर चालते. तो म्हणतो, 'ओटीटीसाठी मी तितकाच तयार आहे, जेवढा चित्रपटगृहांसाठी आणि चित्रपटासाठी काय चांगले असेल, ते चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग सांगेल'.

First published:

Tags: Akshay Kumar, Bollywood, Entertainment, Sara ali khan