VIDEO : 51 वर्षाच्या अक्षय कुमारच्या फिटनेसचं हे आहे रहस्य

नव्या वर्षाची सुरुवात प्रत्येकानं वेगवेगळी केली. बऱ्याच सेलिब्रिटींनी तर आदल्या रात्रीचे फोटो शेअर केले. पण अक्षय कुमारचं ट्विट अनेकांना प्रेरणा देऊन गेलंय.

News18 Lokmat | Updated On: Jan 1, 2019 03:20 PM IST

VIDEO : 51 वर्षाच्या अक्षय कुमारच्या फिटनेसचं हे आहे रहस्य

मुंबई, 01 जानेवारी : नव्या वर्षाची सुरुवात प्रत्येकानं वेगवेगळी केली. बऱ्याच सेलिब्रिटींनी तर आदल्या रात्रीचे फोटो शेअर केले. पण अक्षय कुमारचं ट्विट अनेकांना प्रेरणा देऊन गेलंय.

अक्षय कुमारनं व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर केलाय.  महत्त्वाचं म्हणजे मागे सूर्य उगवतोय. नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय अशी कॅप्शन त्यानं दिलीय. शिवाय या वर्षी दोन अॅक्शन पॅक्ड सिनेमे करतोय, त्यामुळे सकाळी उठायचं कारण आहे, असंही त्यानं म्हटलंय. शिवाय त्यानं सगळ्यांना आरोग्यपूर्ण वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.अक्षय कुमार हा नेहमीच आरोग्याबद्दल जागरुक असतो.जेवणाबरोबर अक्षय व्यायामाबाबतीत पण तितकाच आग्रही आहे. त्यामुळे तो रोज सकाळी 4:30ला उठतो आणि स्वीमिंग करतो. तसंच मार्शल आर्टस आणि मेडिटेशनसाठी तो रोज एक-एक तास काढतो.

Loading...

डेक्कन क्रॉनिकलच्या बातमीनुसार सिंबानंतर रोहित शेट्टी दुसऱ्या एका सिनेमात बिझी असणारेय. तो सिनेमा करणार आहे अक्षय कुमारसोबत. सूत्रांच्या माहितीनुसार हा सिनेमा एकदम मसाला फिल्म असणार. यात जबरदस्त अॅक्शन्स आहेत. कदाचित अक्षय कुमार या सिनेमाची निर्मितीही करणार आहे.

असं समजतंय, अक्षयनं या सिनेमाच्या डेट्स लाॅकही केल्यात. पुढच्या वर्षी सिनेमाचं शूटिंग सुरू होईल. दरम्यात अक्षय त्याच्या केसरी सिनेमाचं प्रमोशनही करणारेय.

याशिवाय अक्षयला एक नवा मोठा सिनेमा मिळालाय. दिग्दर्शक शंकरनं आपल्या सिनेमात अक्षयला काम करण्यासाठी मनवलंय. बातमी अशी आहे की, त्या सिनेमात सुरुवातीला अजय देवगणला नक्की केलं होतं. पण आता शंकरनं अजयला काढून अक्षयला घेतलंय.

हा सिनेमा आहे तरी कुठला? शंकरचा पुढचा सिनेमा आहे 'इंडियन 2'. सिनेमात अक्षय कुमार आणि कमल हासन असतील. पहिल्यांदाच हे दोघं एकत्र असणार आहेत. अजून या सिनेमाची अधिकृत घोषणा केली गेली नाहीय.


Kader Khan- लाचार आयुष्याची यशस्वी कहाणी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 03:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...