अक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'? कोण आघाडीवर?

अक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'? कोण आघाडीवर?

गेल्या आठवड्यात अभिनेता अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम हे दोघंही चित्रपटांच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले. विविध धाटणीच्या कथानकांच्या साथीने या दोघांनीही प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

मुंबई, 20 आॅगस्ट : गेल्या आठवड्यात अभिनेता अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम हे दोघंही चित्रपटांच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले. विविध धाटणीच्या कथानकांच्या साथीने या दोघांनीही प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये दोघांनाही यश मिळालं. पण, यात आता अक्षय कुमारचा 'गोल्ड' हा चित्रपट बाजी मारताना दिसत आहे.आठवडा अखेरीस या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांनी चांगलीच उसळी घेतली असून ते ५० कोटींचा आकडा पार करतील असं चित्र आहे. पण, या साऱ्यामध्ये जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते' या चित्रपटाला काही प्रमाणात निराशेचा सामना करावा लागत असल्याचं स्पष्ट होत आहे.

गोल्डची चार दिवसातली कमाई 55.24 कोटी झालीय, तर सत्यमेव जयते सिनेमाची कमाई 52.42 कोटी झालीय. सुट्टीमुळे येणारा लाँग वीकेण्ड फायदेशीर ठरलाय.

गोल्ड सिनेमात या सिनेमात अक्षय हाॅकी कोचच्या भूमिकेत आहे. त्याला आॅलिम्पिकला भारताची हाॅकी टीम खेळवायचीय. आणि ब्रिटिश खेळाडूंना हरवून गोल्ड जिंकायचंय. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आॅलिम्पिक टीम बनली होती. त्याचे कॅप्टन होते किशन लाल. अक्षयनं यात जी तपनदासांची भूमिका साकारलीय ती किशनलाल यांच्यावर बेतलीय. स्वातंत्र्यानंतर आॅलिम्पिकमध्ये किशन लाल यांनी भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. किशनलाल सुरुवातीला पोलो खेळायचे. त्यांना हाॅकीत अजिबातच रस नव्हता. मध्य प्रदेशात जन्मलेल्या किशनलालनी वयाच्या 14 वर्षापासून हाॅकी खेळायला सुरुवात केली. अक्षय कुमारबरोबर मौनी राॅयचीही भूमिका आहे. या जगजेत्याचं रोमँटिक आयुष्यही पाहायला मिळतेय.

सत्यमेव जयते हा पोलिसांवरचा सिनेमा आहे. जाॅन अब्राहम आणि मनोज वाजपेयी यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात मनोजच्या बायकोची भूमिका अमृता खानविलकरनं केलीय.

First published: August 20, 2018, 4:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading