मी या पुरस्कारासाठी योग्य नसेन तर तो परत घ्या - अक्षय कुमार

राष्ट्रीय पुरस्कार अक्षय कुमारला मिळाला आणि त्याच्यावर सगळीकडे टीकेची झोड उडाली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2017 03:50 PM IST

मी या पुरस्कारासाठी योग्य नसेन तर तो परत घ्या - अक्षय कुमार

25 एप्रिल : राष्ट्रीय पुरस्कार अक्षय कुमारला मिळाला आणि त्याच्यावर सगळीकडे टीकेची झोड उडाली. त्यावर एका कार्यक्रमात अक्षयनं आपली उद्विग्नता व्यक्त केली. तो म्हणाला, ' समीक्षकांना मी या पुरस्कारासाठी योग्य वाटत नसेन, तर तो परत घ्या. '

' मला या इंडस्ट्रीत 25 वर्ष झाली. मला आतापर्यंत एकही पुरस्कार मिळाला नव्हता. मला 26 वर्षांनी  एखादा अॅवाॅर्ड मिळालाय. तोही तुम्हाला हवा असेल तर घ्या परत,' अक्षय म्हणतो. पुढे तो हेही म्हणाला की कोणीही पुरस्कार जिंकला तर काही जण वाद निर्माण करतातच. पण ज्युरींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य नाही. '

राष्ट्रीय पुरस्काराच्या ज्युरी समितीत दिग्दर्शक प्रियदर्शन आहे. अक्षय आणि त्याची मैत्री असल्यानं हा पुरस्कार दिला अशीही टीका होतेय.

राष्ट्रीय पुरस्कारानंतर आता अक्षयचं लक्ष्य पद्मभूषण आहे का? यावर तो म्हणतो,' सन्मान मिळावा म्हणून इच्छा असू शकते, पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...