‘ती चूक मी का केली?’ अक्षय कुमारनं केला धक्कादायक खुलासा

‘मिल्खा सिंग यांच्याबाबत ती खंत कायम राहील’; अक्षय कुमारला बसलाय जबरदस्त मानसिक धक्का

‘मिल्खा सिंग यांच्याबाबत ती खंत कायम राहील’; अक्षय कुमारला बसलाय जबरदस्त मानसिक धक्का

  • Share this:
    मुंबई 19 जून: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा अत्यंत प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. करिअरच्या सुरुवातीस केवळ अॅक्शनपट करणारा अक्षय आता विनोदी, सस्पेंन्स, रोमँटिक अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारताना दिसतो. परंतु असं असताना देखील एक भूमिका नाकारल्याची खंत कायम त्याच्या मनात राहील. अन् ती भूमिका होती खुद्द मिल्खा सिंग (Milkha Singh) यांची. भारताचे फ्लाइंग सिख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिल्खा सिंग यांच्यावर अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) यानं बायोपिक तयार केला होता. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल या भूमिकेसाठी आधी अक्षय कुमारला विचारण्यात आलं होतं. भारताचे महान माजी धावपटू (flying sikh) मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचं कोरोनामुळं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अक्षयनं एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यानं ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाचा उल्लेख केला. अन् ती भूमिका नाकारल्याची खंत व्यक्त केली. ऑलिम्पिकमध्ये अनवाणी पळणारे ‘फ्लाईंग सिख’ का होते इतके लोकप्रिय? जाणून घ्या एक बॅकग्राऊंड डान्सर कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री? पाहा काजल अग्रवालचा थक्क करणारा प्रवास "मिल्खा सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्काच बसला. चित्रपटात त्यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळणार होती. परंतु त्या चित्रपटाला मी नकार दिला. ही खंत कायम माझ्या मनात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना! भावपूर्ण श्रद्धांजली..!" अशा आशयाचं ट्विट करत अक्षयनं आपलं दु:ख व्यक्त केलं. त्याचं ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मिल्खा सिंग यांचा अल्प परिचय मिल्खा सिंग यांची भारताचे महान धावपटू म्हणून ओळख आहे. त्यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले होते. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. रोममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कमगिरी केली. मात्र त्यांचे कांस्यपदक (Bronze Medal) अगदी थोड्या फरकाने हुकले होते.
    Published by:Mandar Gurav
    First published: