आश्चर्यच म्हणायचं ! डाएट न करता खिलाडी अक्षय कुमारनं असं कमी केलं 6 किलो वजन

आश्चर्यच म्हणायचं ! डाएट न करता खिलाडी अक्षय कुमारनं असं कमी केलं 6 किलो वजन

सध्या अक्षय 'मिशन मंगल'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असला तरीही नेहमीप्रमाणेच सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती त्याच्या फिटनेसची.

  • Share this:

मुंबई, 7 ऑगस्ट : अभिनेता अक्षय कुमार सध्या सगळीकडेच खूप चर्चेत आहेत. यावर्षी त्याचे सलग 4 सिनेमे रिलीज होत आहेत. लवकरच त्याचा बहुचर्चित सिनेमा ‘मिशन मंगल’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या अक्षय 'मिशन मंगल'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असला तरीही नेहमीप्रमाणेच सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती त्याच्या फिटनेसची. एकाच वर्षात अशाप्रकारे सलग सिनेमांसाठी फिटनेसही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. अक्षयनं नुकतंच त्याच्या आगामी सिनेमांसाठी 6 किलो वजन कमी केलं आहे. 51 वर्षीय अक्षयनं ‘सूर्यवंशी’ आणि ‘बच्चन पांडे’ या त्याच्या सिनेमांसाठी वर्कआउटद्वारे आपलं वजन कमी केलं. मात्र यासाठी त्यानं कोणताही डाएट प्लान फॉलो केलेला नाही.

अक्षयनं नुकतंच मिशन मंगलच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये आपल्या फिटनेसबाबतचा हा खुलासा केला. अक्षय म्हणाला, मी आगामी सिनेमा ‘सूर्यवंशी’ आणि ‘बच्चन पांडे’ साठी माझं वजन कमी केलं आहे आणि हे पूर्णपणे सामान्य पद्धतीनं केलं. यात कोणत्याही प्रकारच्या स्पेशल डाएटचा समावेश नव्हता. फक्त वर्कआउटच्या सहाय्यानं मी जवळापास 6 किलो वजन कमी केलं.

7 वर्ष पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून राहिलेल्या भारताच्या 'रॉबिनहुड'वर येणार सिनेमा

 

View this post on Instagram

 

Core training my way through the summer heat with these wooden beads...great for the back and stomach muscles. Also best time of the year to sweat it out 🌞 Time for a #FitIndia 🙌🏻

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

अक्षय करत नाही डाएट

या प्रमोशन इव्हेंट अक्षयला त्याच्या डाएटबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला, मी कोणतही डाएट करत नाही. त्यापेक्षा मी अधिक व्यायामावर भर देतो आणि हे सर्व नैसर्गिक पद्धतीनं होतं. जर तुम्हाला वाटत असेल की मी खाणं कमी करतो तर ते चुकीच आहे. मी माझं जेवणाचं रोजचं रुटीन तसंच ठेवतो आणि वर्कआउट वाढवतो. अक्षयचा ‘मिशन मंगल’ येत्या 15  ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन शक्ति यांनी केलं आहे.

EXCLUSIVE देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतर माझं गाणं सुरू झालं नाही- अमृता फडणवीस

अक्षय साकारणार अजित डोभाल यांची व्यक्तिरेखा

मिशन मंगल शिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता नीरज पांड्ये आणि अक्षय कुमार पुन्हा एकदा काम करण्यास तयार झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही जोडी आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांच्यावर सिनेमा तयार करणार आहे आणि यात अजित डोभाल यांची भूमिका अक्षय साकारणार असून नीरज पांड्ये या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. नीरज आणि अक्षय यांनी याआधीही ‘बेबी’ आणि ‘स्पेशल 26’ सारखे सुपरहिट सिनेमा दिले आहेत.

समोर आलं अभिनेत्रीचं दुःख, लग्नानंतर काश्मीरपासून झाली होती दूर

==================================================================

VIDEO: पुरामुळे छतावर आली मगर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 11:15 AM IST

ताज्या बातम्या