मुंबई, 3 ऑक्टोबर : 'मंगळयान'मधला शास्त्रज्ञ, केसरी मधला शीख योद्धा, हाउसफुलमधला बनवेगिरी करणारा तरुण, 2.0 मधला सुपरव्हिलन, पॅडमॅनमधला बायकोसाठी सॅनिटरी पॅड बनवणारा अवली... अक्षय कुमारने आत्तापर्यंत अगदी वेगवेगळ्या छटा असलेल्या भूमिका केल्या आहेत. आता त्याच्या करिअरमधली आणखी एक आव्हानात्मक भूमिका करण्यात तो सज्ज झाला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या फोटोत याची एक झलक दिसते आहे.
ऐन नवरात्रात दुर्गामातेच्या शेजारी उभ्या असलेल्या अक्षयचा हा लुक सिनेमाविषयी उत्सुकता वाढवणारा आहे. अक्षयने ही पोस्ट शेअर करताना म्हटलंय की, नवरात्र हा आपल्या आतल्या अपार शक्तीची उपासना करण्याचा सण आहे. या दिवशी मी लक्ष्मीचा लुक शेअर करत आहे. या नव्या भूमिकेसाठी मी खूप एक्सायटेड आणि नर्व्हस आहे. पण यातच मजा आहे. कंफर्ट झोन संपतो तिथेच नवं आयुष्य सुरू होतं. हो ना?
Loading...View this post on Instagram
लक्ष्मी बाँब हा एका ट्रान्सजेंडरच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे.
हे वाचा - 'मुळशी'चा आणखी एक पॅटर्न.. बैल पोळ्याच्या मिरवणुकीत बारबालांचे बीभत्स नृत्य
अक्षय यात किन्नर किंवा ट्रान्सजेंडरची भूमिका करणार आहे. तमीळ हॉरर फिल्म मुनी 2 : कांचना याचा लक्ष्मी बाँब हा रीमेक आहे. कियारा अडवानी या सिनेमात अक्षयबरोबर दिसेल. गुड न्यूज या सिनेमातही ही जोडी दिसली होती. दिलजीत दोसांज आणि करीना कपूर खान हेदेखील या सिनेमात आहेत.
लक्ष्मी बाँब हा चित्रपट पुढच्या वर्षी रीलिज होणार आहे.
चक्क पैशांऐवजी तरुणावर आली कांदा लॉकरमध्ये ठेवण्याची वेळ, VIDEO VIRAL
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा