अक्षय कुमारचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा कोण आहे 'तो'?

अभिनेता अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखलं जातं. ज्या सिनेमात अक्षय काम करतो तो सिनेमा सुपरहीट होतो असं मानलं जातं.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 06:07 PM IST

अक्षय कुमारचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा कोण आहे 'तो'?

मुंबई, 22 ऑक्टोबर : अभिनेता अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखलं जातं. ज्या सिनेमात अक्षय काम करतो तो सिनेमा सुपरहीट होतो असं मानलं जातं. त्याचा प्रत्येक सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतो. तसेच त्याचे सर्वच सिनेमा बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करतात. सध्या त्याचे 2 सिनेमा प्रचंड चर्चेत आहेत. पहिला ‘हाउसफुल 4’ आणि दुसरा ‘लक्ष्मी बॉम्ब’. पण या दरम्यान अक्षय कुमारचा सलग दुसरा सिनेमा एका बॉलिवूड अभिनेत्यानं आपल्या नावे केला आहे.

अक्षय कुमारचा सलग दुसरा सिनेमा आपल्या नावे करणाऱ्या या अभिनेत्याचं नाव आहे. कार्तिक आर्यन. काही दिवसांपूर्वीच अक्षयचा सुपरहीट सिनेमाचा सिक्वेल भूल भूलैय्या 2 मधील कार्तिक आर्यनचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. या सिनेमात कार्तिक अक्षया कुमारचं कॅरॅक्टर साकरणार आहे. अशातच आता कार्तिकनं अक्षयचा आणखी एक सिनेमा आपल्या नावे केल्याचं म्हटलं जात आहे. अक्षयच्या हेरा फेरीच्या तिसऱ्या पार्टसाठी कार्तिक आर्यनला साइन केल्याचं बोललं जात आहे.

बॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली

कार्तिक आर्यनच्या एका फॅनक्लब हे वृत्त इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. या पेज एका आर्टिकलचा स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला आहे. हे आर्टिकल फिल्म फेअर मासिकातील असल्याचं बोललं जात आहे. ‘भूल भुलैय्या 2’ नंतर आता कार्तिक आर्यननं ‘हेरा फेरी 2’ साइन केला आहे.’ असं या आर्टिकलमध्ये म्हटलं आहे. मात्र हे वृत्त कितपत खरं आणि किती खोटं हे कार्तिकच सांगू शकेल. पण असं झाल्यास कार्तिक नशीब जोरावर आहे असं म्हणणं वागवं ठरणार नाही.

Loading...

समद्या गावाला झालिया लग्नाची घाई! रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL

सध्या कार्तिक त्याच्या 2 आगामी सिनेमांची तयारी करत आहे. यातील 'लव्ह आज कल 2' सिनेमा सारा अली खानसोबत आहे. तर दुसरा सिनेमा 'पति पत्नी और वो' भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्यासोबत आहे. सध्या कार्तिकला एका मागोमाग एक बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमा मिळत आहेत.

अमिताभ यांच्या मोबाइलमध्ये 'या' नावानं सेव्ह आहे जया बच्चन यांचा नंबर

=========================================================

VIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 06:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...