अक्षय कुमारच्या मेकअपचा हा Video पाहाल तर तुम्हाला धक्काच बसेल!

सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा '2.0' सिनेमा येत्या 29 नोव्हेंबरला रिलीज होतोय.

News18 Lokmat | Updated On: Nov 17, 2018 10:27 AM IST

अक्षय कुमारच्या मेकअपचा हा Video पाहाल तर तुम्हाला धक्काच बसेल!

मुंबई, 17 नोव्हेंबर : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा '2.0' सिनेमा येत्या 29 नोव्हेंबरला रिलीज होतोय. या सिनेमाची पोस्टर्स आतापर्यंत शेअर झाली होती. पण आता अक्षय कुमारचा मेकअप करतानाचा एक व्हिडिओ बाहेर आलाय. तो बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. एखाद्या अभिनेत्याची मेहनत किती असू शकते, हे यातून समजून येते.


एका मुलाखतीत अक्षय कुमारनं या मेकअपबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला, 'या व्यक्तिरेखेसाठी मी जेवढा मेकअप केलाय, तेवढा आतापर्यंत कधीच केला नाही. मेकअपलाच मला 4 तास लागायचे. पुन्हा तो काढण्यासाठी अडीच तास जायचे. ' अक्षय या सिनेमात खलनायकाची भूमिका करतोय.



Loading...


अक्षय आणि रजनीकांतचा हा '2.0' सिनेमा रोबोटचा सिक्वल आहे. रजनीकांत यात डबल रोलमध्ये आहे, तर अक्षय खलनायक आहे. 400 कोटींचा बनलेला हा सिनेमा भारतातला सर्वात महागडा सिनेमा आहे.


काही दिवसांपूर्वी रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या '2.0' सिनेमातल्या एमी जॅक्सनचा लूक रिलीज झाला होता. . या पोस्टरमध्ये एमी रोबोटच्या लूकमध्ये दिसते. हा सिनेमा रजनीकांच्या 'रोबोट'चा रिमेक आहे.


एमीनं आपला लूक ट्विटरवर शेअर करत लिहिलं होतं, मी या सिनेमाचं शूट सुरू केलं, तेव्हापासून हा लूक शेअर करायची वाट पाहत होते. या सिनेमात अक्षय खलनायकाच्या भूमिकेत आहे.


अक्षय कुमारला आपण अनेक रूपात पाहिले. रुस्तम, एअरलिफ्ट, पॅडमॅन, टाॅयलेट एक प्रेमकथा असे अनेक सिनेमे हटके होते आणि ते हिटही झाले. अलिकडे रिलीज झालेला गोल्ड सिनेमाही 100 कोटींच्या घरात गेलाय. त्यामुळे दोन सुपरस्टार्स असलेल्या या '2.0' सिनेमाबद्दल उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2018 10:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...